घरमनोरंजनमुंबईत रंगणार ३१वा संगीत नाटक महोत्सव !

मुंबईत रंगणार ३१वा संगीत नाटक महोत्सव !

Subscribe

महाराष्ट्र शास्त्रीय नृत्य, गायन, वादन यांची फक्त परंपरा जपणारं राज्य नाही. इथे पूर्वापार चालत आलेल्या आणि जगभर कौतुक झालेल्या मराठी संगीत नाटकांचे जतनही केलेले आहे. विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर, गो. ब. देवल, कृष्णाजी खाडीलकर, राम गणेश गडकरी यांच्यापासून सुरू झालेली ही संगीत नाटकाची परंपरा त्याच्यानंतर आलेल्या पिढीने आपल्या पद्धतीने जपली.

नवी पिढी मूळ संगीताचा गाभा तसाच ठेवून, बदलत्या काळानुसार प्रेक्षकांना रुचेलअशा पद्धतीने संगीत नाटक सादर करीत असते. परंतू आज मनोरंजनाची अनेक माध्यमे उपलब्ध असताना प्रत्येक संस्थेला प्रयोगात सातत्य ठेवता येते असे नाही. ज्या संस्थांनी मोठ्या जिद्दीने या संगीत परंपरेला स्वीकारलेले आहे, ते आजही महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रयोग करताना दिसतात. ही संगीत नाटकं एकत्रितपणे पाहायला मिळावीत म्हणून सांस्कृतिक दृष्ट्या पुढे असलेले नेहरू सेंटर प्रत्येक वर्षी मराठी संगीत नाटकांच्या महोत्सवाचे आयोजन करते. यंदा ३१ वा महोत्सव याच महिन्यात २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान नेहरू सेंटरच्या नाट्यगृहात रोज सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून, एकूण चार नाटकांचा यात समावेश आहे.

- Advertisement -

‘संगीत माऊली’ ही मुंबई मराठी साहित्य संघाची निर्मिती आहे. प्रमोद पवार दिग्दर्शित राम पंडित यांचे संगीत लाभलेललं हे नाटक पहिल्याच दिवशी होणार आहे. दुसऱ्या दिवशी ‘संगीत ऋणानुबंध’ हे नाटक आहे. रत्नागिरीच्या खल्वायन या संस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकाचे डॉ. श्रीकृष्ण जोशी हे लेखक असून दिग्दर्शन प्रदीप तेंडुलकर यांनी केले आहे. राम तांबे यांचे संगीत या नाटकाला लाभले आहे. २५ ऑगस्टला ‘संगीत संत तुकाराम’ हे नाटक ओम नाट्यगंधाची निर्मिती आहे. ज्ञानेश महाराव जे पत्रकार, गायक, अभिनेते आहेत ते या नाटकाचे सादरकर्ते आहेत.

बाबाजी राणे यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन संतोष पवार यांनी केले आहे. ‘संगीत तमसो मा ज्योतिर्गमय’ शेवटच्या दिवशी सादर होणार आहे. ज्याचे लेखक, दिग्दर्शक विलास सुर्वे आहेत. निळकंठ गोखले यांच्या संगीत रचनेत ते सादर होणार आहे. खास दापोलीहून ही ब्राह्मणहितवर्धिनी सभा कलाकार मंडळी येणार आहेत.१८ऑगस्ट पासून सकाळी १०. ३० वाजल्यापासून इथल्या बुकिंग काउंटरवर विनामूल्य प्रवेशिका द्यायला सुरुवात होईल.

- Advertisement -

 


हेही वाचा : विजय देवरकोंडा आणि समंथा रुथ प्रभू यांची बहारदार केमिस्ट्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -