घरमनोरंजनअमेय वाघला हवी आहे तुमची मदत...

अमेय वाघला हवी आहे तुमची मदत…

Subscribe

सध्या अमेय वाघच्या एका फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पण या कमेंट्स त्याच्या फोटोवर नसून फोटोला दिलेल्या कॅप्शनवर आहेत.

मुरांबा, फास्टर फेणे मधून सगळ्यांच लक्ष ज्याने वेधून घेतलं तो अभिनेता म्हणजे अमेय वाघ. त्यानंतर आलेल्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकातील आपल्या अभिनयाने आपलं वेगळं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं. सध्या अमेय वाघच्या एका फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. पण या कमेंट्स त्याच्या फोटोवर नसून फोटोला दिलेल्या कॅप्शनवर आहेत.

अमेयने सोशलमिडीयावर चाहत्यांकडून एक मदत मागितली आहे. त्यामुळे अमेय एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. अमेय ने एक फोटो फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘जरा मदत हवीये तुमची, मुलीसाठी नाव सुचवा प्लीज,’असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे. अमेयच्या या पोस्टवर भरभरून लाइक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत. प्रिया बापट, निपुण धर्माधिकारी,इशा केसकर,मिथीला पालकर यांनीसुद्धा मुलींसाठी नावं सुचवली आहेत.

 

View this post on Instagram

 

जरा मदत हवीये तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज!

A post shared by amey wagh (@ameyzone) on

- Advertisement -

तर अमेय च्या फॅन्सनी अनेक मुलींची नावं त्याचा सुचवली आहेत. काही फॅन्सनी तर अमेय आणि साजिरी हे नाव एकत्र करत नवीन नाव देखील तयार केली आहेत. त्यांच्या घरात नवीन पाहुण्याचं आगमन होणार का, असा प्रश्न काहींनी विचारला आहे.

तर काहींनी हे कुठल्या तरी चित्रपटाचं प्रमोशन असल्याचा अंदाज वर्तवला आहे. अमेयने २०१७मध्ये साजिरी देशपांडे हिच्याशी लग्नगाठ बांधली.अनेकांनी अमेयवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

Happy Valentine’s Day to you from @sajirid and her driver ! Clicked by @yogi_and_his_camera

A post shared by amey wagh (@ameyzone) on

- Advertisement -

आता या मागचं नेमकं कारण काय ते अमेयच सांगू शकेल. तुर्तास तुम्ही अमेयला मुलींची नाव सुचवायला मदत करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -