घरमनोरंजनश्रेया घोषालने दाखवली बाळाची पहिली झलक,श्रेयाच्या गोंडस बाळाचे फोटो पाहा

श्रेया घोषालने दाखवली बाळाची पहिली झलक,श्रेयाच्या गोंडस बाळाचे फोटो पाहा

Subscribe

बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते पुरते उत्सुक झाले आहेत. श्रेयाने चाहत्यांचे प्रेम पाहता तिच्या बाळाच्या नावाची घोषणा करत त्याची काहीशी झलक सोशल मीडियावर दाखवली आहे

 

आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकणारी बॉलिवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने तिच्या चाहत्यांना नुकतच काही दिवसांपूर्वी आनंदाची बातमी दिली होती. श्रेयाच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे श्रेयाने एका गोंडस बाळाला जन्मदिला असून श्रेया आता आई झाली असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट केले होते. बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते पुरते उत्सुक झाले आहेत. श्रेयाने चाहत्यांचे प्रेम पाहता तिच्या बाळाच्या नावाची घोषणा करत त्याची काहीशी झलक सोशल मीडियावर दाखवली आहे. मुलाचे नाव देवयान मुखोपध्याय (Devyaan Mukhopadhyaya) असे ठेवण्यात आल्याचे संगितले आहे. इतकेच नाही तर भले मोठे कॅप्शन देत. श्रेयाने सर्व स्वप्नवतच असल्याचे लिहलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by shreyaghoshal (@shreyaghoshal)

- Advertisement -

२०१५ मध्ये श्रेया घोषाल प्रियकर शिलादित्यासोबत विवाहबंधनात अडकली होती. दूरदर्शनवरील ‘सा रे ग म प’ या गायनस्पर्धेत श्रेया विजेती झाली होती. त्यानंतर तिच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. देवदास या चित्रपटात तिने पहिल्यांदा पाश्वगायन केले. या चित्रपटातील गायनासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार व फिल्मफअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. श्रेयाने आजवर जवळपास १४ भाषांमध्ये गाणी गायली आहेत. वयाच्या चोथ्या वर्षापासून श्रेयाने संगीताचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. पार्श्वगायनासोबतच ती काही रिअॅलिटी शोज मध्येही परीक्षक म्हणून दिसली आहे.


हे हि वाचा – मलायका मला आतून ओळखते म्हणत,अर्जुनने उघडपणे केल्या भावना व्यक्त!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -