घरमनोरंजनपहिल्यांदाच बायोपिकचा सिक्वेल

पहिल्यांदाच बायोपिकचा सिक्वेल

Subscribe

आता धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचा सिक्वेल येणारेय. पहिल्यांदाच बायोपिकचा सिक्वेल बनणार आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा बायोपिक ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटातून धोनीचे माहीत नसलेले पैलू पाहायला मिळाल्यामुळे रसिकांना चित्रपट फारच भावला होता. त्यानंतर आता धोनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ‘एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाचा सिक्वेल येणारेय. पहिल्यांदाच बायोपिकचा सिक्वेल बनणारेय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिक्वेलमध्ये धोनी कर्णधार असताना २१०११ साली भारतीय संघ विश्वविजेता बनल्याचा प्रवास आणि नुकतीच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता आणि सीएसके टीम विजयी झाली हे क्षणदेखील चित्रपटातून अनुभवता येणारेय. तसेच धोनीचे खासगी आयुष्य आणि त्याची पत्नी साक्षी व त्याची मुलगी झिवा यांच्यासोबतची केमिस्ट्रीदेखील आपल्याला पाहायला मिळणारेय. पुन्हा एकदा धोनीची भूमिका अभिनेता सुशांत सिंग राजपूत करणारेय. बायोपिकचा सिक्वेल बनण्याची ही पहिलीच वेळ असून कदाचित धोनीच्या बायोपिकच्या सिक्वेलनंतर हा ट्रेंड पाहायला मिळाला तर वावगं ठरणार नाही.

 

- Advertisement -
Pipsi
‘पिप्सी’ चित्रपटातील क्षण

मैथिली व साहिलची होतेय प्रशंसा

ग्रामीण भागातील दोन छोट्या मुलांचे भावविश्व ‘पिप्सी’ या चित्रपटात मांडण्यात आलंय. यात बालकलाकार मैथिली पटवर्धन व साहिल जोशी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट वास्तवदर्शी होण्यासाठी ‘पिप्सी’चे संपूर्ण शूटिंग विदर्भात करण्यात आलं. यवतमाळ येथील अरणी तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या दिवसात चित्रपटाचे चित्रीकरण केल्यामुळे चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण युनिटला दुष्काळाचा त्रास सहन करावा लागला. पाण्याची कमतरता, आजूबाजूला सुकलेलं रान व पस्तीस डिग्रीहून अधिक तापमान असणार्‍या भागात बालकलाकारांसोबत चित्रीकरण करणं आव्हानास्पद होतं. प्रचंड उन्हामुळे मैथिली व साहिल यांच्या घशाला चित्रीकरणादरम्यान कोरड पडत होती. अतिउष्णतेमुळे त्यांची तब्येतदेखील बिघडण्याची दाट शक्यता होती. मात्र या छोट्या कलाकारांनी खडतर वातावरणाचा परिणाम आपल्या कामावर पडू दिला नाही. आपापला अभिनय चोख बजावला असून त्यांची खूप प्रशंसा होतेय. खरंच या बालकलाकारांचे कौतूक करू तेवढं कमीच आहे.

 

- Advertisement -
Sonu-Sood
सोनू सूद

सोनूचा बॉडी डबलला नकार

आशुतोष गोवारीकरच्या ‘जोधा अकबर’ या ऐतिहासिकपटात काम केल्यानंतर आता अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा ऐतिहासिकपटात अभिनय करण्यासाठी खूप उत्सुक आहे. आता तो कंगना रानौत अभिनीत ‘मणिकर्णिका’ चित्रपटात तो शूर योद्धा सदाशिवच्या भूमिकेत दिसणारेय. या सिनेमात तो खूप साहसीदृश्य व तलवारबाजी करणारेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनू नेहमीच फिटनेस आणि पिळदार शरीरयष्टीसाठी ओळखला जातो. स्वतःचे साहसीदृश्य त्याला स्वतःलाच करायलाआवडतात. ‘मणिकर्णिका’मध्ये तो खूप वजन असणार्‍या तलवारनं स्टंट्स व अ‍ॅक्शन करताना दिसणारेय. त्यासाठी निर्मात्यांनी त्याला बॉडी डबल वापरायला सांगितली होती. मात्र त्याने नकार दिलाय. विशेष म्हणजे मुंबई व हैदराबाद येथे अ‍ॅक्शन स्टंट्सच्या चित्रीकरणावेळी सोनूनं अ‍ॅक्शन सीन करून निर्मात्यांना व सहकलाकारांना आश्चर्यचकीत केले.

मला स्वतःचे स्टंट करायला मजा येते आणि त्यातून मला वेगळा आनंद मिळतो. जेव्हा तुम्ही चांगल्या दिग्दर्शक आणि टेक्निकल टीमसोबत काम करता तेव्हा काहीही चुकीचं घडत नाही.

 -सोनू सूद,अभिनेता

Renee
रेनी कुजूर

रेना बनली रिहाना..

बर्‍याचदा माणसाच्या रंगावरून लोक परीक्षण करतात. चेहर्‍याचा रंग जर काळा असेल तर बर्‍याचदा कमी लेखलं जातं. तेच जर गोरा रंग असेल तर सुंदर आणि आकर्षक समजलं जातं. मात्र काही सेलेब्सचा स्कीन टोन डार्क असला तरी ते लोकप्रिय आहेत. त्यांचा चाहता वर्ग आहे. काळा असूनही प्रसिद्ध आहे ही खूप मोठी बाब आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर प्रसिद्ध पॉप सिंगर रिहानाचंच घ्या ना.. भलेही तिचा रंग काळा असला तरी तिच्या आवाजात जादू आहे आणि तिचा मोठा फॅन फॉलोविंग आहे. रिहानासारखीच आणखीन एक मुलगी आहे जिचे नशीब उजळलंय. तिचं नाव रेनी कुजूर असून, ती भारतातील छत्तीसगढमधली आहे. रिनीचा रंग काळा असल्यामुळे सुरुवातीला तिला खूप वाईट गोष्टी ऐकाव्या लागल्या. तीन वर्षांची असल्यापासून तिला मॉडेलिंगची आवड होती. पण, तिला काली परी असे लोक चिडवायचे; पण, आता त्याच काली परीला लोक भारताची रिहाना असं संबोधताहेत आणि लोक आता तिचे खूप कौतूक करताहेत. सुरुवातीला रेनीला काम मिळवणं कठीण झालं होतं. मात्र तिच्या एका मित्रानं तिचा फोटो एडिट करून सोशल मीडियावर शेअर केला. त्यात ती हुबेहुब रिहानासारखी दिसत होती. त्यामुळे लोकांची तिला पसंती मिळू लागली आणि कामही मिळू लागलं. आता लोक तिला रिना ऐवजी रिहाना अशीच हाक मारतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -