घरमहाराष्ट्रपावसाळी अधिवेशनाचे कामकाज 'पाण्यात'; मुसळधार पाऊस, बत्ती गुल

पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ‘पाण्यात’; मुसळधार पाऊस, बत्ती गुल

Subscribe

नागपुरातील पावसाळी अधिवेशनात वरूण राजा जोरदार बसरला आणि तिसऱ्या दिवशीचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विधीमंडळ परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने विरोध देखील सरकारवर जोरदार बरसले.

नागपुरात कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका पावसाळी अधिवेशनाला बसला आहे. विधीमंडळ परिसरात मुसळधार पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याने तिसऱ्या दिवशीचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्याच दिवशी पावसामुळे पाणी साचल्याने विधीमंडळाच्या परिसराला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर बरसायला सुरूवात केली आहे. तसेच बाटल्यांचा आणि प्लॅस्टिकचा खच गटारातून बाहेर आल्याने नालेसफाईचा देखील फज्जा उडाला. आमदार निवासांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली. त्यात कमी म्हणून की काय विज गायब झाली. त्यामुळे चोहीकडे अंधारच अंधार अशी परिस्थिती निर्माण झाली. या साऱ्या प्रकारावरून विरोधकांनी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. शिवाय, स्मार्ट सिटीच्या मुद्यावरून देखील विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान स्वीच रूममध्ये पाणी भरलं असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विज बंद केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

मुंबईत पाणी तुंबले की बोंब मग नागपूरचे काय ?

मुसळधार पावसामुळे नागपूर विधीमंडळ परिसरात गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे अधिवेशनाचे तिसऱ्या दिवशीचे कामकाज तहकूब करण्यात आले. सर्वत्र पाणी, बाटल्या आणि प्लॅस्टिकचा खच. हाच मुद्दा पकडत शिवसेने भाजपवर निशाणा साधला. मुंबईमध्ये पाणी साचले की शिवसेनेच्या नावाने बोंब मारता? मग नागपुरातील परिस्थितीला जबाबदार कोण? मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये अशी अवस्था आहे मग त्याबद्दल आता भाजप काय बोलणार?असा सवाल देखील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री नागपूरला स्मार्ट सिटी करण्याची घोषणा करतात मग नागपूरची ही अवस्था का? असा सवाल देखील यावेळी विरोधकांनी विचारला आहे. पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस, त्यात मुसळधार पावसामुळे कामकाम बंद पडल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबद्दल देखील विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -