घरमनोरंजनऐकावं ते नवलच! 'या' पाकिस्तानी अभिनेत्याने बायकोला सरप्राइज देण्यासाठी केलं अख्खं थिएटर...

ऐकावं ते नवलच! ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्याने बायकोला सरप्राइज देण्यासाठी केलं अख्खं थिएटर बुक

Subscribe

पाकिस्तानी अभिनेता मुनीब बटने आपल्या पत्नीला सरप्राइज द्यायचं ठरवलं,पण प्रत्यक्षात त्याच्या या खास सरप्राईजने सर्वांनाच चकित केले. वास्तविक मुनीब बट्टची पत्नी अभिनेत्री आयमान खान आलिया भट्टची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे ती आलियाचा 'गंगूबाई काठियावाड़ी' चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होती.

आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाने १०० करोडचा टप्पा पार करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाने चित्रपटाला चार-चाँद लावलेले आहेत. कडक अभिनय आणि उत्तम व्यक्तिरेखा साकारून आलियाने सिद्ध केले की, ती जन्मापासूनच एक उत्तम कलाकार आहे. आलियाने तिच्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ पाडलेली आहे. खरं तर आश्चर्य म्हणजे एका पाकिस्तानी अभिनेत्याने आलियाचा ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपट पाहण्यासाठी अख्खं थिएटर बुक केलं होतं.

पाकिस्तानी अभिनेत्याने दिलं बायकोला सरप्राईज

- Advertisement -

पाकिस्तानी अभिनेता मुनीब बटने आपल्या पत्नीला सरप्राईज द्यायचं ठरवलं, पण प्रत्यक्षात त्याच्या या खास सरप्राईजने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. वास्तविक मुनीब बट्टची पत्नी अभिनेत्री आयमान खान आलिया भट्टची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे ती आलियाचा ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होती. त्यामुळेच बायकोला खूश करण्यासाठी पाकिस्तानी अभिनेता मुनीब बटने संपूर्ण थिएटर बुक केलं.

नवऱ्याने दिलेल्या या अनोख्या सरप्राइजमुळे पत्नी आयमान खान खूप खूश झाली, इतकंच नाही तर या सरप्राइजमुळे आलियाचे फॅन देखील खूश दिसत आहेत. ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या चित्रपटाने आणि त्यातील आलियाच्या अभिनयाने जगभरातील लोकांना भुरळ घातली आहे, हे स्पष्टपणे पाहायला मिळतंय.

- Advertisement -

राझीनंतरचा दुसरा दमदार अभिनय

गेल्या काही वर्षांत आलियाने तिच्या दमदार अभिनयाने सिद्ध केले आहे की, ती चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका करू शकते. ‘राझी’मध्ये आलियाने भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली होती, तेव्हा तिच्या अभिनयाने सगळेच प्रभावित झाले होते. यानंतर तिने ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील भूमिका साकारली, पडद्यावर आलिया नाही तर फक्त गंगूबाईच दिसली. ही गंगूबाई प्रेक्षकांना खूप भावली. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे आलियाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.


हेही वाचासिद्धार्थ मितालीच्या नवीन आयुष्याची सुरुवात, मुंबईत घेतलं स्वत:चं घर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -