घरमनोरंजनTiger 3- भाईजानला टक्कर देण्यासाठी कॅटरीना होत आहे सज्ज, जिममध्ये गाळतेय घाम

Tiger 3- भाईजानला टक्कर देण्यासाठी कॅटरीना होत आहे सज्ज, जिममध्ये गाळतेय घाम

Subscribe

बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री कॅटरीना कैफने(Katrina Kaif) आपल्या अभिनय कौशल्येच्या बळावर अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. कॅटरीनाचा कल नेहमी वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याकडे असतो. सध्या कॅटरीना टायगर 3 (tiger 3)या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तिच्या या बहुचर्चित सिनेमाची वाट चाहते आतुरतेने पाहत आहेत. या सिनेमात काम करण्यासाठी कॅटरीना प्रचंड मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे. नुकतच कॅटरीनाने तिच्या सोशल मीडिया(Social Media) अकांऊटवर एक्सरसाइज करताना अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे.

कॅटरीना प्रचंड फिटनेस फ्रिक असून आपल्या अभिनयासोबतच फिटनेसची देखील विशेष काळजी घेत असते.तसेच कॅटरीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसोबत तिच्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात माहिती शेअर करत असते. नुकतचं कॅटरीनाचा वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ तिने ऑस्ट्रिया मधून शेअर केला असून व्हायरल व्हिडिओमध्ये कॅटरीना एक्सरसाइज करताना दिसत आहे. कॅटरीना ऑस्ट्रियामध्ये ‘टागयर 3’ या सिनेमाचं चित्रीकरण करत असून ती अभिनेता सलमान खान(Salmaan Khan) सोबत  या सिनेमात झळकणार आहे.

व्हिडिओ पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

- Advertisement -

व्हिडिओ मध्ये कॅटरीना प्रचंड एनर्जेटीक असल्याचे दिसून येत आहे. तसेच ती वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइज करत आहे. कॅटरीनाचा फिटनेस ट्रेनर तिला गाईड करत आहे. व्हिडिओ शेअर करत कॅटरीनाने याला कॅप्शन देत म्हटलं आहे की,”मी माझे डोके संपूर्णपणे ट्रेन केले आहे. आता या प्रमाणेच माझे शरीर देखील याला फॉलो करेन, जर असे नाही झाले तर मी @rezparkview याला बोलावून घेईन”. या संपूर्ण ट्रेनिंग दरम्यान असे दिसून येत आहे की कॅटरीना सलमान खालना टायगर 3 सिनेमात टक्कर देण्यासाठी जिममध्ये प्रचंड घाम गाळत आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – सोनू सूदने २० कोटींहून अधिक टॅक्स चोरल्याचा IT विभागाचा दावा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -