घरमनोरंजनखारमध्ये टायगर श्रॉफचा नवा आशियाना

खारमध्ये टायगर श्रॉफचा नवा आशियाना

Subscribe

टायगरनं मुंबईमध्ये एक ड्युप्लेक्स अपार्टमेंटची खरेदी केली आहे. हे अपार्टमेंट ८ बेडरूमचं असून ५६ कोटी किंमत असल्याची माहिती मिळाली आहे

टायगर श्रॉफ सध्या आपल्या सुपरहिट ‘बागी २’ चित्रपटामुळं खूपच चर्चेत आला. आपला फिटनेस आणि डान्स या दोन्हीसाठी टायगरचे बरेच चाहतेही आहेत. सध्या टायगर ‘स्टुडंट ऑफ द इयर २’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. मात्र या चित्रीकरणातून वेळ काढून टायगरनं आपल्या कुटुंबाला एक सरप्राईज दिलं आहे. टायगरनं मुंबईमध्ये एक ड्युप्लेक्स अपार्टमेंटची खरेदी केली आहे. हे अपार्टमेंट ८ बेडरूमचं असून ५६ कोटी किंमत असल्याची माहिती मिळाली आहे. हे नवं घर वरळीमध्ये असून लवकरच हे घर टायगर सजवायला सुरुवात करेल असं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळत आहे. सध्या आपल्या नव्या घराकडे टायगर जास्त लक्ष देत असून जॉन अब्राहमच्या भावाला टायगरनं इंटिरिअर करण्याची जबाबदारी दिली आहे.

एलान अब्राहमच्या कामावर प्रभावित

टायगर श्रॉफनं अभिनेता जॉन अब्राहमच्या घरातील इंटिरिअर बघितलं आणि त्यानंतर तो प्रभावित झाला. जॉनचं घर हे त्याचा भाऊ एलान अब्राहमनं डिझाईन केलं आहे. एलानचं काम बघितल्यानंतर टायगरनं आपल्या घराचं इंटिरिअरदेखील एलानकडूनच करून घ्यायचा निर्णय घेतला. आता नवं घर घेतल्यानंतर त्यानं ही जबाबदारी एलानला दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगरच्या नव्या घराची डील याच महिन्यात पूर्ण झाली आहे. तर, त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्या या यशामध्ये आनंदी आहे. या घराला एलान स्पेशियस आणि कंटेम्प्ररी लुक देणार असून कमीत कमी वस्तूंचा यामध्ये उपयोग करणार असल्याची माहिती आहे. तर या नव्या घरामध्ये टायगर जिमचा पर्यायदेखील ठेवणार आहे.

- Advertisement -

टायगरची आई आयेशादेखील करणार मदत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगरची आई आयेशा श्रॉफदेखील त्याच्या घराच्या सजावटीमध्ये मदत करणार आहे. टायगरनं नेहमीच आपल्या आई आणि वडिलांविषयी प्रेम व्यक्त केलं आहे. सध्या टायगर अनन्या पांडे आणि सुतारिया यांच्यासह ‘स्टुडंट ऑफ द इयर २’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय टायगर अजून ‘बागी ३’ आणि ‘रँबो’ या दोन चित्रपटांमध्ये काम करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -