घरमनोरंजनतितिक्षा तावडे- सिद्धार्थ बोडके अडकले लग्नबंधनात

तितिक्षा तावडे- सिद्धार्थ बोडके अडकले लग्नबंधनात

Subscribe

मराठी सिनेसृष्टीत सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. 24 फेब्रुवारी रोजी अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर यांनी लग्नगाठ बांधली. तर आता‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि ‘दृश्यम 2’ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके यांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. दोघांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तितीक्षा आणि सिद्धार्थच्या जवळच्या मैत्रिणीने त्यांच्या लग्नसोहळ्यातील पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सिद्धार्थ-तितीक्षाच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा चालू होती. अखेर ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे. या जोडप्याच्या लग्नाला गौरी नलावडे, रसिका सुनील व तिचा पती, खुशबू तावडे, संग्राम साळवी, अनघा अतुल, ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर अशा बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली आहे.

- Advertisement -

तितिक्षाने लग्नात मोती रंगाची नऊवारी परिधान केली आहे. त्याला सोनेरी रंगाचा काठ आहे. ज्यावर सोनेरी रंगाचं नक्षीकाम करण्यात आलं आहे. तर त्याच रंगाची शालही तिने घेतली आहे. सोबत कॉन्ट्रास्ट सोनेरी रंगाचा ब्लाउज परिधान केलं आहे. तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. डोईवर मुंडावळ्या आणि चेहऱ्यावर हसू यात ते दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.

titeekshaa

- Advertisement -

सिद्धार्थ आणि तितिक्षा गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांनी एक फोटो शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल चाहत्यांना सांगितलं होतं. आता अखेर त्यांचं अनेक वर्षांचं नातं एका बंधनात अडकलं आहे. ठाण्यात हा विवाहसोहळा अतिशय थाटामाटात पार पडला आहे. या विवाहसोहळ्याला त्यांच्या कुटुंबीयांसोबतच मित्रपरिवाराला आमंत्रण देण्यात आलं होतं. आता तितिक्षा आणि सिद्धार्थ एकमेकांचे झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -