घरमनोरंजनVideo: 'गोल्ड मेडल' मिळवलेल्या दिग्गजांच्या भावना

Video: ‘गोल्ड मेडल’ मिळवलेल्या दिग्गजांच्या भावना

Subscribe

स्वातंत्र्यानंतर भारताला हॉकी खेळामध्ये मिळालेल्या पहिल्या सुवर्णपदकाचा प्रवास, गोल्ड चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

येत्या १५ ऑगस्टला अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ चित्रपट प्रदर्शित होणार असून, सध्या सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा आहे. दरम्यान गोल्ड चित्रपटाच्या अगदी काही दिवस आधीच अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या ट्वीटरवरुन एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारताचे विविध खेळाडू देशाला ‘गोल्ड मेडल’ मिळाल्यानंतरच्या त्यांच्या भावना शेअर करताना दिसत आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, कपील देव, अभिनव बिंद्रा, विजेंद्र सिंह, सुनील छत्री, पी.व्ही.सिंधू आणि सानिया मिर्झा इत्यादी दिग्गज खेळाडू आहेत. ‘गोल्ड’ हा चित्रपट देखील भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या पहिल्या ऑलिम्पिक गोल्ड मेडलची कथा आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने एक खास कॅप्शनही दिलं आहे. ‘भारताला स्वतंत्र होऊन ७० वर्षं पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने भारतासठी पहिलं गोल्ड मेडल जिंकणाऱ्यांच्या तोंडून त्यांच्या भावना जाणून घ्या आणि हा उस्तव साजरा करा’, असं कॅप्शन अक्षयने दिलं आहे.
हेही वाचा : अक्षय कुमारचा बायोपिक येणार?

या चित्रपटात अक्षयकुमार हॉकी खेळाडू तपन दासची भूमिका साकारत असून त्याचं स्वप्नं देशासमोर आणणार आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून देण्याचं त्याचं स्वप्नं या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री मौनी रॉयचा ‘गोल्ड’ हा डेब्यू चित्रपट आहे. याव्यतिरिक्त चित्रपटामध्ये कुणाल कपूर, अमित साध, विनीत सिंह आणि सनी कौशल यांच्यादेखील प्रमुख भूमिका आहेत. खेळावरील आधारित चित्रपटाला नेहमीच भारतामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळं ‘गोल्ड’ चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल हे लवकरच कळेल.

हेही वाचा : म्हणून ‘गोल्ड’ खेळावरचा सर्वात मोठा चित्रपट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -