घरट्रेंडिंगअक्षय कुमारचा बायोपिक येणार?

अक्षय कुमारचा बायोपिक येणार?

Subscribe

बॉलीवूडमध्ये बायोपिक चित्रपटांचा सध्या ट्रेन्ड आला आहे. सतत नवनव्या बायोपिक चित्रपटांची घोषणा आपल्याला ऐकायला मिळतात. सतत कोणीतरी अभिनेता किंवा दिग्दर्शक एखाद्या व्यक्तीवर बायोपिक बनवण्याची इच्छा व्यक्त करत असतात. काही बॉलीवूड सेलिब्रिटी आणि खेळाडूंवरसुद्धा बायोपिक्स येत आहेत, शिवाय काही बॉलीवूड कलाकारांचे बायोपिक येणार असल्याच्या घोषणा झाल्या आहेत. त्यामुळे एका मुलाखतीदरम्यान बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारला ‘तुझ्या जीवनावर आधारीत बायोपिक बनवायला तुला आवडेल का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला की, ‘माझ्या जीवनावर आधारीत बायोपिक काढायला मी मूर्ख नाही, या जगात, प्रामुख्याने आपल्या देशात असे अनेक लोक आहेत, ज्यांच्या कथा तुम्हाला, मला प्रेरीत करतात. अशा लोकांच्या जीवनावर आधारीत बायोपिक करायला मला नेहमीच आवडेल. ‘तपन दास’ किंवा ‘अरुणाचलम मुरुगनंथम’ यांच्यासारखी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. हे लोक त्यांच्या कामाद्वारे मोठे झाले आहेत. हे लोक सामाजासाठी आणि देशासाठी प्रेरणास्त्रोत आहेत, अशा लोकांचे बायोपिक करायला मला आवडतील’.

म्हणून अक्षयला त्याच्यावर बायोपिक काढायला आवडणार नाही

अक्षय कुमारची कथा लोकांसाठी प्रेरणादायक आहे. अक्षयनेदेखील त्याच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी अक्षय एका हॉटेलात शेफचे काम करत होता. त्यानंतर त्याने अनेक लहान मोठी कामे केली. बॉलीवूडमध्ये संधी मिळाल्यानंतर सुरुवातीला त्याचे १४ चित्रपट फ्लॉप झाले, तरीदेखील तो थांबला नाही मेहनत करत राहिला. आता तो बॉलीवूडमधील आघाडीचा नायक आहे. त्यामुळे अक्षयची गोष्टदेखील लोकांसाठी प्रेरणादायक आहे. त्यामुळे अक्षयच्या जीवनावर आधारीत बायोपिक तयार करावा असे अनेकांना वाटते, परंतु अक्षयने त्यास नकार दिला आहे. अक्षय म्हणाला की आपल्याकडे बायोपिक बनवण्यासाठी खूप कथा आहेत. त्यामुळे बायोपिक बनवण्याठी माझी कथा योग्य नाही. मला माझ्या आयुष्यावर कधीही बायोपिक बनवायला आवडणार नाही. तसेच मला माझ्या जीवनावर पूस्तकदेखील लिहायला आवडणार नाही

- Advertisement -

आतापर्यंत बॉलीवूडमध्ये आलेले बायोपिक्स

भाग मिल्खा भाग
पान सिंग तोमर
दंगल
जोधा अकबर
बाजीराव मस्तानी
पदमावत
बँडिट क्वीन
सरदार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
गांधी
नीरजा
एम. एस. धोनी : दी अनटोल्ड स्टोरी
मांझी : दी माऊंटन मॅन
संजू
नेताजी सुभाषचंद्र बोस
वीर सावरकर
सरबजीत
शाहीद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -