घरमनोरंजनविराटने अनुष्कासह शेअर केला त्याच्या चिमुकलीचा फोटो अन् लिहिली भावनिक पोस्ट

विराटने अनुष्कासह शेअर केला त्याच्या चिमुकलीचा फोटो अन् लिहिली भावनिक पोस्ट

Subscribe

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली काही दिवसांपूर्वी आई-वडिल बनले. सोशल मीडियावर अनुष्काच्या बाळाबद्दल बरीच चर्चा होताना दिसली. अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीनेही काही दिवसांपूर्वी त्यांच्या बेबी गर्लचा फोटो पोस्ट केला होता. तसेच या बाळाचे नाव देखील चाहत्यांसह शेअर केले होते. आता पुन्हा एकदा विराटने अनुष्कासोबत त्याच्या मुलीचा फोटो पोस्ट केला आहे. विराटने शेअर केलेले हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने विराटने ही खास पोस्ट शेअर केली असून विराट कोहलीने त्याची मुलगी वामिका आणि अनुष्का शर्माचा फोटो पोस्ट करत लांबलचक पोस्ट देखील लिहीली आहे. विराट कोहलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये अनुष्का आपल्या मुलीला मांडीवर घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये लहान बाळाचा चेहरा दिसत नसला तरी अनुष्काच्या आपल्या चिमुकलीला खेळवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

- Advertisement -

या ११ मार्च रोजी वामिका दोन महिन्यांची होईल. या अगोदरच वामिकाच्या वडिलांनी अर्थात विराटने ही पोस्ट शेअर केली, आणि लिहिलं की, ‘मुलाचा जन्म पाहणे भाग्यची गोष्ट आहे. माणसासाठी हा एक अविश्वसनीय आणि आश्चर्यकारक अनुभव असू शकतो. ही गोष्ट पाहिल्यानंतर, आपल्याला महिलांचे खरे सामर्थ्य आणि देवत्व समजले आणि देवाने त्यांच्यामध्ये जीवन का निर्माण केले हे आपण समजू शकतो. कारण ते आपल्यापेक्षा बलवान आहेत. माझ्या आयुष्यातील सर्वात दयाळू आणि बळकट महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच, आपल्या आईसारख्या बनणाऱ्या मुलीला शुभेच्छा. जगातील सर्व महिलांनाही महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -