घरमनोरंजनआदित्यकडून मिळते पॉझिटिव्हिटी - विराजस कुलकर्णी

आदित्यकडून मिळते पॉझिटिव्हिटी – विराजस कुलकर्णी

Subscribe

प्रेमाचं नातं कसं खुलतं हे सांगणारी 'माझा होशील ना' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. एका अनोख्या कुटुंबाची आणि हळुवार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. या मालिकेतून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या निमित्ताने त्याच्यासोबत साधलेला हा खास संवाद

१. तुझं नाव हे मराठी इंडस्ट्रीला नवीन नाही, पण ‘माझा होशील ना’ या मालिकेतून टेलिव्हिजन माध्यमात पदार्पण करतोय त्याबद्दल काय सांगशील?

– घरी आई आणि आजोबा हे अभिनय क्षेत्रात असल्यामुळे माझा मराठा इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. मला पहिल्यापासूनच शूटिंग कसं होतं, बिहाईंड द सिन काय होतं यात मला जास्त इंटरेस्ट होता. २०१५ मध्ये स्क्रिप्ट रायटिंगचा कोर्स केल्यानंतर मी ऍक्टिंग छंद म्हणून करत होतो पण ऑडिओ-व्हिज्युअल क्षेत्रात माझा खरा कल हा लेखन आणि दिग्दर्शनाकडे होता. ही मालिका मला खूप इंटरेस्टिंग तऱ्हेने मिळाली. मला या मालिकेच्या ऑडिशनसाठी कॉल आला आणि मी ऑडिशन रेकॉर्ड करून पाठवलं. २ दिवसात मला सिलेक्शनचा कॉल आला आणि लगेच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मालिकेचं शूटिंग सुरु केलं. हे सगळं इतक्या लवकर घडलं कि त्यावेळी विचार करण्याचा वेळचं नव्हता. पण ही खूप मोठी संधी आहे माझ्यासाठी. मला नेहमीच झी मराठी वाहिनीवर मालिका करण्याची इच्छा होती आणि ती आता पूर्ण झाली आहे.

२. तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील?

– या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा खूप इंटरेस्टिंग आहे. या मालिकेचं शूटिंग आम्ही लगबगीने सुरु केलं. त्यामुळे शूटिंग करता करताच मला माझ्या व्यक्तिरेखेबद्दल अधिकाधिक माहिती मिळतेय. हळूहळू मी या व्यक्तिरेखेचे एक एक पैलू उलगडतोय. मला पहिल्याच दिवशी असं सांगण्यात आलं होतं कि आदित्य म्हणजे कृष्ण आहे. जसं कृष्णाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं तसंच आदित्यच्या चेहऱ्यावर देखील नेहमीच स्मित हास्य असतं. कितीही कठीण परिस्थिती आली तरी तिला धैर्याने आणि हसतमुखाने तो सामोरं जातो. तो खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळे ही भूमिका साकारताना त्याच्यातील पॉझिटिव्हिटी माझ्यातही येतेय असं मला वाटतं.

- Advertisement -

३. पहिल्याच मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांसोबत तू काम करतो आहे, हा अनुभव कसा आहे?

मी खूप लकी आहे कि मला अशा दिग्गज कलाकारांसोबत पहिल्याच मालिकेत काम करायची संधी मिळाली. माझं या सगळ्यांसोबत एक पर्सनल कनेक्शन आहे. या ५ ही दिग्गज कलाकारांच्या कामाने लहानपणापासून माझ्या मनावर ठसा उमटवला आहे आणि आता या सगळ्यांसोबत एकत्र काम करताना मला खूपचं छान वाटतंय. त्यांच्या अनुभवातून ते मला अनेक गोष्टी सांगतात, चुकलं तर निदर्शनास आणून देतात, एखादा प्रसंग चांगला झाला तर प्रोत्साहन देखील देतात. ते इतके मनमिळावू आहेत कि ते मला कधी कधी माझ्याच वयाचे वाटतात. ते आमच्याहीपेक्षा जास्त धमाल आणि दंगा सेटवर करतात.

४. सेटवरील वातावरण कसं असतं, तुम्ही ऑफस्क्रीन काय धमाल करता?

सेटवरच वातावरण जसं मालिकेत दिसतं तसंच आहे. आम्ही सेटवर खूपच धमाल करतो. जसे सेटवर जेष्ठ कलाकार असतात तसंच वातावरण सेटवर असतं आणि या सगळ्या कलाकारांमुळे आमचा सेट खूपच हसता खेळता असतो.

- Advertisement -

५. तू मालिकेबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील?

ही मालिका खूप वेगळ्या पद्धतीची आहे. नेहमी जे आपल्याला टीव्ही वर सासू-सून, किंवा लव्ह ट्रँगल पाहायला मिळतं तसं या मालिकेत काहीच नाही आहे. हा एक पूर्णपणे खुसखुशीत फॅमिली ड्रामा आहे. आमचे दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर यांनी खूप विचार करून या मालिकेचा लुक कसा वेगळा दिसेल यावर मेहनत घेतली आहे. या मालिकेचा लुक एकदम आकर्षक आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील ही मालिका बघताना काहीतरी फ्रेश आणि नवीन पाहिल्यासारखं वाटेल याची मला खात्री आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -