घरमनोरंजनमुन्नीनंतर आता मुन्ना होणार बदनाम

मुन्नीनंतर आता मुन्ना होणार बदनाम

Subscribe

अभिनेता सलमान खानच्या 'दबंग ३'मध्ये अभिनेत्री वारिना हुसैन आयटम सॉन्ग सादर करणार आहे.

बॉलिवूडमध्ये चित्रपट चालो न चालो पण आयटम सॉन्ग्स हमखास चालतात. सलमान खानचा सुपरडूपर हिट चित्रपट ‘दबंग’चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातही आयटम सॉन्ग असणार आहे. सध्या त्याच आयटम सॉन्गची चर्चा सर्वत्र होत आहे.

सलमानसोबत अभिनेत्री वारिना हुसैन दिसणार गाण्यात

अभिनेता अरबाज खान दिग्दर्शित दबंग ३ मध्येही यापूर्वीच्या दबंग सिरीजप्रमाणे आयटम सॉन्ग आहे. नुकतेच या आयटम सॉन्गचे चित्रीकरण पूर्ण झाले. मुन्ना बदनाम हुआ असे या आयटम सॉन्गचे बोल आहेत. बॉलिवूड अभिनेत्री वरीना हुसैन आणि अभिनेता सलमान खानवर हे आयटम सॉन्ग चित्रीत करण्यात आले आहे. यापूर्वी दबंग चित्रपटात मुन्नी बदनाम हुई हे आयटम सॉन्ग होते. यामधील अभिनेत्री मलायका अरोराच्या ठुमक्यांनी हे आयटम सॉन्ग खूप गाजले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरीना या गाण्यात पूर्णपणे वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे. सलमान खानचा डिझायनर एशले लोबोने वरीनाचा या गाण्यातीन लूक डिझाइन केला आहे. या गाण्यात वरीना इंडो-वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसणार आहे. प्रसिद्ध कोरियोग्राफर वैभवी मर्चंटने हे गाणे कोरियोग्राफ केले आहे.

- Advertisement -

दबंगची ही गाणीही झाली प्रसिद्ध

दबंग चित्रपटाचे यापूर्वी दोन भाग येवून गेले आहेत. पहिल्या भागात अभिनेत्री मलायका अरोराने मुन्नी बदनाम हुई हे आयटम सॉन्ग सादर केले होते. तर दबंग २ मध्ये अभिनेत्री करिना कपूरने फेविकोल से या आयटम सॉन्गवर ठुमके लगावले होते. दोन्हीही आयटम सॉन्ग्स तुफान हीट ठरले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -