घरमनोरंजनVideo: दमदार अभिनय असलेला 'सांड की आंख' चा ट्रेलर लाँच

Video: दमदार अभिनय असलेला ‘सांड की आंख’ चा ट्रेलर लाँच

Subscribe

अनुराग कश्यप यांचा 'सांड की आंख' या चित्रपटात तापसी पन्नू आणि भूमि पेडनेकर शिवाय 'मुक्काबाज' फेम विनीत सिंह देखील दिसणार

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर स्टारर चित्रपट ‘सांड की आंख’ चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर दमदार असून या ट्रेलरमध्ये अभिनेत्री तापसी आणि भूमी या दोघींचा अभिनय त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीत उतरणारा आहे. या ट्रेलरमधील दोघींचे डायलॉग सगळ्याचे लक्ष वेधून घेतात. यामध्ये काही डायलॉग हे विनोदी आहेत तर काही डायलॉग भावूक करतात.

- Advertisement -

दरम्यान या चित्रपटात दोन्ही अभिनेत्री वृद्ध शुटर्स महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोन्ही महिला जोहरी गांवातील असून या दोन्ही महिला शूटर महिला प्रकाशी तोमर आणि चंद्रो तोमर यांच्या भूमिकेत तापसी आणि भूमी दिसणार आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होताच सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनुराग कश्यप यांचा ‘सांड की आंख’ या चित्रपटात तापसी पन्नू आणि भूमि पेडनेकर शिवाय ‘मुक्काबाज’ फेम विनीत सिंह देखील दिसणार आहे.

- Advertisement -

बघा हा ट्रेलर

जगातील प्रौंढ महिला शूटरच्या नावाने चंद्रो तोमर यांची ओळख आहे. त्यांचे वय ८७ असून आज देखील झोपताना शुटिंग गन जवळ घेऊन झोपतात. आपल्या दोघी पायांना फ्रॅक्चर आणि ऑपरेशन झाल्यानंतर देखील जोशात आपला चित्रपट आणि शूटिंगच्या खेळांना प्रमोट करायला चूकत नाही.


हेही वाचा – त्या दोघींच्या ‘शार्पशूटींग’ ची गोष्ट
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -