घरविधानसभा २०१९लवकरच युतीची घोषणा होईल - चंद्रकांत पाटील

लवकरच युतीची घोषणा होईल – चंद्रकांत पाटील

Subscribe

शिवसेना-भाजप युतीबद्दल सगळीकडेच संभ्रमावस्था असतानाच भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत 'युतीची लवकरच घोषणा होईल', असं जाहीर केलं आहे.

एकीकडे राज्यात शिवसेना आणि भाजपची आगामी विधानसभा निवडणुकांसाठी युती होणार की नाही, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाचा त्याविषयी वेगवेगळी विधानं या दोन्ही पक्षांची नेतेमंडळी करत आहेत. त्यामुळे यामध्ये अधिकच संभ्रम निर्माण होण्याचं चित्र निर्माण झालं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपला ५०-५०% जागावाटपाच्या आश्वासनाची आठवण करून दिली. वर भाजप आरएसएसला मानणारा पक्ष असल्यामुळे ते दिलेला शब्द पाळतील अशी आशा आहे, असा टोमणा देखील राऊत यांनी मारला होता. पुढचे २४ तास युतीसाठी महत्त्वाचे आहेत, असं देखील राऊत म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर लवकरच युतीची घोषणा होईल, अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केली आहे. त्यामुळे, आता तरी युती नक्की होईल का? असाच प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला आहे.


हेही वाचा – ..भाजपसोबत जाणं ही शिवसेनेची चूक होती-संजय राऊत

संजय राऊत यांना टोला

दरम्यान, यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला हाणला. ‘संजय राऊत हे एक चांगले लेखक आहेत. ते अनेक उदाहरणांमधून आपली गोष्ट समोर ठेवत असतात’, असं पाटील म्हणाले. संजय राऊत यांनी युतीसंदर्भात दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘पुढचे २४ तास युतीसाठी महत्त्वाचे असून भाजप दिल्या शब्दाला जागेल, अशी शिवसेनेला आशा आहे’, अशी भूमिका मांडली होती.

- Advertisement -

हेही वाचा – नारायण राणेंचा कार्यकर्ता मेळावा रद्द; भाजपकडून नवं आश्वासन?

राणेंच्या पक्षप्रवेशावर मांडली भूमिका

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणेंच्या प्रलंबित भाजप प्रवेशावर देखील पक्षाची भूमिका मांडली. ‘आमच्याकडे सर्व कार्यकर्ते आहेत. मी अध्यक्ष आहे, माझे हे स्थान आहे अशा गोष्टी काँग्रेसमध्ये चालतात. पण भाजप आपल्या सहयोगी पक्षाशी चर्चा करूनच निर्णय घेतो. राणेंच्या बाबतीत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंशी बोलूनच निर्णय घेतील’, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -