घरमनोरंजनBigg Boss 17 Final : कोण पटकवणार 'बिग बॉस 17'ची ट्रॉफी?

Bigg Boss 17 Final : कोण पटकवणार ‘बिग बॉस 17’ची ट्रॉफी?

Subscribe

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून कलर्सच्या हिंदी वाहिनीवर बिग बॉस 17 चे पर्व सुरू होते. नेहमीच वादग्रस्त राहिलेल्या या रिअॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा आज पार पडणार आहे. या महाअंतिम सोहळ्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. हा कार्यक्रम जितका वादग्रस्त ठरला आहे, तितकाच तो लोकांच्या पसंतीसही उतरला आहे. त्यामुळे 17 व्या पर्वाच्या ट्रॉफीवर कोणाचे नाव कोरले जाणार? हे जाणून घेण्याची सर्व बिग बॉस चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. हिंदीच्या ‘बिग बॉस 17’ चा महाअंतिम सोहळा आज (ता. 28 जानेवारी) सायंकाळी 6 वाजता सुरू होणार आहे. कलर्सच्या हिंदी वाहिनीवर हा सोहळा पाहता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा अंतिम सोहळा तब्बल सहा तास चालणार आहे. याचे थेट प्रक्षेपण OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वरही पाहता येणार आहे. (Who will win the ‘Bigg Boss 17’ trophy?)

हेही वाचा… बॉबी देओलचा ‘कंगुवा’ चित्रपटातील जबरदस्त लूक प्रदर्शित

- Advertisement -

Bigg Boss 17 च्या महाअंतिम फेरीत पाच स्पर्धकांना स्थान मिळवता आले आहे. यामध्ये हिंदी मालिकांमधील अभिनेता अभिषेक कुमार, अभिनेत्री मनारा चोप्रा, अभिनेत्री अंकिता लोखंडे, स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि युट्यूब गेमर अरुण माशेट्टी यांचा समावेश आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे ही पती विक्की जैन याच्यासोबत या पर्वात सहभागी झाली होती. मात्र स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्यात येत विक्कीला घराबाहेर जावे लागले. यंदाचे पर्व हे विविध कारणांमुळे प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले. त्यामुळे या पर्वाचा विजेता कोण होणार? यांकडे सर्व प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही पर्वांपासून बिग बॉसच्या विजेत्याला केवळ काही लाखांचा चेक दिला जातो. परंतु, यंदाच्या पर्वात तसे काही होणार नसून 17 व्या पर्वातील विजेत्याला भरघोस बक्षीस दिले जाणार आहे. बिग बॉस 17 च्या विजेत्याला 30 ते 40 लाख रुपयांचा चेक तर दिलाच जाणार आहे. त्याशिवाय, विजेत्याला ट्रॉफी आणि त्यासोबतच एक कारही दिली जाणार आहे. त्यामुळे यंदाचा बिग बॉस विजेता हा मालामाल असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस संपूर्ण सोशल मीडियावर सर्वाधिक ट्रेंड होताना पाहायला मिळत आहे. सलमान खान या शोचे गेल्या अनेक पर्वांपासून सूत्रसंचालन करत आहे. ज्यामुळे सलमान खानचे बिग बॉस अशी सुद्धा या रिअॅलिटी शोची वेगळी ओळख आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -