घरमनोरंजनसुशांतच्या चाहत्यांचे Wikipedia विरोधात अभियान, यावर वेबसाईट फाउंडरने दिले उत्तर

सुशांतच्या चाहत्यांचे Wikipedia विरोधात अभियान, यावर वेबसाईट फाउंडरने दिले उत्तर

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला वर्ष लोटले तरी चाहत्यांमध्ये त्याचा आठवणी कायम आहेत. अद्यापही सीबीआय, एनसीबी, ईडी सगळ्या संस्था त्याच्या मृत्यूचा उलगडा करण्यात गुंतले आहेत. यात सुशांतचे अनेक चाहते त्याला न्याय मिळवून देण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. सुशांतच्या न्यायासाठी चाहत्यांनी सोशल मीडिया म्हणा किंवा इतर माध्यमातून अनेक अभियान, ट्रेन्ड सुरु केले. परंतु हे प्रकरण भारतापूर्तेच मर्यादित राहिले नसून जागतिक स्तरावरही विदेशी चाहते त्यांच्या न्यायासाठी आवाज उठवत आहेत. याचदरम्यान सुशांतच्या चाहत्यांचे Wikipedia विरोधात एक नवे अभिनाय सुरु झाले आहे. कारण या Wikipedia वरील सुशांतच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करणाऱ्या एका मजकुरामुळे चाहत्यांचा संताप अनावर झाला आहे. Wikipedia विरोधातील आता हे अभियान जोर पकडत असल्याने या वेबसाईटच्या संस्थापकांनी स्वत; प्रतिक्रिया देत सांगितले की, येथे संपूर्ण माहिती विश्वसनीय सूत्रांवर आधारित असते.

सुशांतसाठी सोशल मीडियावर आजही सुरु आहेत नवे ट्रेन्ड

गेल्या वर्षी १४ जून रोजी मुंबईस्थित एका इमारतीमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला. या दिवंगत अभिनेत्याचे मृत्यू कारण . Wikipedia मध्ये गळफास घेत आत्महत्या असा स्वरुपात लिहिण्यात आले आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी सुशांतच्या चाहत्यांनी . Wikipedia वरून मृत्यूचे कारण बदला असे सांगत, सुशांतचा मृत्यू हा हत्या होती असा आरोप केला गेला. सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली यामुद्द्यावरून सोशल मीडियावर सुरु झालेले अभियान आता सोशल मीडियावर नवनवीन ट्रेन्ड सुरु करतयं. सध्या सोशल मीडियावर #Wikipedia #सुशांत_की_हत्या_की_गई_थी असे ट्रेन्ड सुरु झाले आहेत.

- Advertisement -

Wikipedia संस्थापकांनी दिले चाहत्यांना उत्तर

विकिपीडियाचे संस्थापक जिमी वेल्स यांनी सुशांतच्या चाहत्यांकडून सुरु असलेल्या ट्रेन्डला उत्तर देत सांगितले की, वेबसाईट विश्वसनीय सुत्रांवर आधारित आहे. ना ही ट्विटर अभियानावर. यासोबतच त्यांनी वेबसाईटची मार्गदर्शक तत्वे पोस्ट करत विश्वसनीय स्त्रोत काय असतो याचा लिंक शेअर केल्या. तसेच सुशांच्या एडमिनिस्ट्रेटर पेजप्रमाणे दिसणारे पेजही पोस्ट केले आहे. ज्यामध्ये पोस्टमध्ये केलेले बदल नोंदविले आहेत. वेल्सने स्वत:ते अकाउंटही पोस्ट करत चाहत्यांना सोबत चर्चा करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

अद्यापही सुशांतचे चाहते चौकशी समित्यांवर नाराजी व्यक्त करत आहेत. कारण केंद्रीय तपास यंत्रणा आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून आजही तपास सुरु आहे. यातून काहीच निष्कर्ष अद्याप बाहेर आलेला नाही. या तपास यंत्रणांवर आता सुशांतची मैत्रीण स्मिता पारिखनेही कडवी प्रतिक्रिया दिली आहे.


Nude video घटनेची सल मनात ११ वर्षांनीही, राधिकाने ४ दिवस कोंडून घेतले होते


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -