‘बबिताची’ बिग बॉस ओटीटीमध्ये एन्ट्री, मालिकेतून एक्झिट?

अभिनेत्री मुनमुन दत्ता 'तारक मेहता का उलटा चष्मा' हि मालिका सोडणार का ? मागच्या काही दिवसांपूर्वी या मालिकेतील तारक मेहता हे पात्रं साकारणारा अभिनेता शैलेश लोढा(shailesh lodha) याने सुद्धा मालिका सोडली असे वृत्त समोर आले होते.

संपूर्ण देशभरातच ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (taarak mehta ka ooltah chashmah) या हिंदी मालिकेने स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. या मालिकेतील कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा यासुद्धा प्रत्येकाच्याच पसंतीस उतरल्या आहेत. या मालिकेतील बबिता (babita) हे पात्रंसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं, पण आता या मालिकेत बबिता हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (munmun dutta) हीसुद्धा मालिका सोडून बिग बॉस ओटीटीच्या पुढल्या पर्वात झळकणार असल्याच्या चर्चा होत आहेत.

या मालिकेतील दयाबेन हे पात्रं साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने काही वर्षांपूर्वी तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका सोडली आणि त्यानंतर इतर काही कलाकारांनीही ही मालिका सोडली मागच्या काही दिवसांपूर्वी या मालिकेतील तारक मेहता हे पात्रं साकारणारा अभिनेता शैलेश लोढा(shailesh lodha) याने सुद्धा मालिका सोडली, असे वृत्त समोर आले होते. आणि आता अभिनेत्री मुनमुन दत्ता (munmun dutta) हीसुद्धा मालिका सोडणार आहे, असं म्हटलं जात आहे.

बिग बॉस हा हिंदी शो घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटी स्पर्धक म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपल्या आवडत्या कलाकारांना बिग बॉस या रिऍलिटी शोमध्ये पाहण्यासाठी चाहतेसुद्धा उत्सुक असतात. मालिकेमधल्या पात्रांपेक्षा एखाद्या रिऍलिटी शोमध्ये हे कलाकार स्पर्धकांची भूमिका कशा प्रकारे निभावतात हे प्रेक्षकांना पाहणं औत्सुक्याचं असतं. दरम्यान बिग बॉस ओटीटी या हिंदी रिऍलिटी शोच्या पुढच्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी तारक मेहता फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता ( munmun dutta) हिला विचारणा करण्यात आली आहे. आणि जर या कार्यक्रमासाठी मुनमुनने होकार दिला तर ती तारक मेहता का उलटा चष्मा या शोमधून बाहेर पडेल. पण अद्याप मुनमुन दत्ता हिने बिग बॉस ओटीटीमध्ये ती सहभागी होणार आहे ही नाही याबद्दल उलगडा झालेला नाही. या पूर्वीही मुनमुन दत्ता ही बिग बॉसच्या १५ (munmun dutta bigg boss 15) व्या सिझनमध्ये चॅलेंजर म्हणून दिसली होती आणि त्यावेळीसुद्धा मुनमुनने मालिका सोडली आहे, अशा चर्चा रंगल्या होत्या.

कोव्हिडच्या दरम्यान तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेची संपूर्ण टीम दमणला शूटिंगसाठी शिफ्ट करण्यात आली होती. पण तेव्हाही मुनमुन तिथे दिसली नाही आणि त्यामुळे मुनमुनने मालिका सोडली, असं बोललं गेलं होतं. पण त्याचा खुलासा करत ‘ज्या वेळी मालिकेची टीम दमणमध्ये होती, तेव्हा मालिकेत जो स्टोरी ट्रॅक सुरू होता त्यामध्ये मी जे बबिताचं पात्रं साकारत होते, त्याच्या स्टोरीमध्ये तेव्हा गरज नव्हती, असं मुनमुनने स्पष्ट केलं’.  त्यामुळे आता मुनमुन बिग बॉस ओटीटी (big boss ott) च्या नव्या पर्वाची ऑफर स्वीकारणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.