Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी प्रेग्नंसीवरुन केलं ट्रोल, यूट्यूबर अभिनेत्री उर्मिलाने दिलं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

प्रेग्नंसीवरुन केलं ट्रोल, यूट्यूबर अभिनेत्री उर्मिलाने दिलं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही ही स्त्री जातीची शोकांतिका आहे.

Related Story

- Advertisement -

सध्या युट्यूबर आपल्या कमाल व्हिडिओनी अनेक स्रियांच्या मनात आपली हक्काची ओळख बनणारी अभिनेत्री यूट्यूबर उर्मिला निबांळकर (Urmila Nimbalkar) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. एक अभिनेत्री म्हणून उर्मिलाने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर एक यूट्यूबर म्हणून ती सध्या ‘उर्मिला निंबाळकर’ या तिच्या यूट्यूब चॅनेलवरुन ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किनकेअर, मेकअप, DIY आणि फॅशन यांसारख्या विषयावर व्हिडिओ घेऊन येत असते. उर्मिला सध्या आणखी एका खास गोष्टीसाठी चर्चेत आहे ते म्हणजे तिची प्रेग्नंसी. उर्मिला प्रेग्नंट असून तिला आता नववा महिना सुरु झाला आहे. तिच्या प्रेग्नंसीचा संपूर्ण प्रवास तिने तिच्या चाहत्यासोबत शेअर केलाय. मात्र या सगळ्यात तिला ट्रोलर्सना देखील समोरे जावे लागले आहे. उर्मिला नेहमीच तिच्या गोड,प्रेमळ आणि शांत स्वभावाने तिच्या यूट्यूब फॅमिलीचे मन जिंकले आहे. त्याचप्रमाणे तिच्या प्रेग्नंसी वरुन तिला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना देखील तिने सयंमी प्रतिक्रिया देऊन चांगलचं सडेतोड उत्तर दिलय. (YouTuber actress Urmila Nimbalkar Trolls from pregnancy, gives unequivocal answer to trollers)

- Advertisement -

उर्मिला तिच्या प्रेग्नंसी प्रवासातील अनेक लहान लहान गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्याकडे येणाऱ्या नव्या पाहुण्याचे स्वागत करणासाठी ती आणि तिचा नवरा सुकिर्त गुमास्ते (Sukirt Gumaste) दोघेही उत्सुक आहेत. नुकतेच त्यांनी उर्मिलाचे बेबी शॉवर देखील सेलिब्रेट केले.

- Advertisement -

आमचं बाळ काय ढगातून पडलंय का? हिच्या प्रेग्नंसीचे एतक काय कौतुक? असे पोट दाखवत फिरण शोभत का? अशा अनेक कमेंट उर्मिलाला येत होत्या. त्यावर उर्मिलाने तिच्या नवव्या महिन्यातले सुंदर असे तिच्या बेबी बंपसोबतचे फोटो शेअर लिहिले आहे की, ‘मागच्या ९ महिन्यात या सगळ्या कमेंट्स मला स्त्रीयांनीच पाठवल्यात. स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही ही स्त्री जातीची शोकांतिका आहे. पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रीयांना सांगेन जेवढे हे क्षण टिपतां येत असतील तेवढे टिपून घ्या.
या संपुर्ण प्रवासाचा खुप आनंद लूटा. हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत. (त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं) मला तर विश्वासच बसत नाहीय की माझा ९ वा महिना सुद्धा संपायला आता काही दिवसंच राहिलेत. आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे,अशी सयंमी प्रतिक्रिया देत उर्मिलाने तिच्या ट्रोलर्सना चांगलचे उत्तर दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री हेमांगी कवीला देखील तिच्या एका व्हिडिओमुळे ट्रोल करण्यात आले. त्यावर देखील अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. हेमांगीने बाई,बुब्स आणि ब्रा या पोस्टवर मांडलेल्या भूमिकेला अनेकांनी सहमती दर्शवली. हेमांगीला देखील ट्रोल करणाऱ्या १० पैकी ८ महिला होता. त्यांना तिने चांगलेच सडेतोड उत्तर दिले.


हेही वाचा – आषाढी एकादशी निमित्त अमृता आशिषचा विठ्ठलचरणी नृत्याविष्कार

- Advertisement -