घरफिचर्सबॉलीवूड आणि ड्रग्ज हब 'मालदि्वज' !

बॉलीवूड आणि ड्रग्ज हब ‘मालदि्वज’ !

Subscribe

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानला जामिन मिळू नये यासाठी एनसीबी कसून प्रयत्न करत आहे. आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला देत एनसीबीने आता नवोदित अभिनेत्री अन्यना पांडेभोवती चौकशीचा फास आवळला आहे. त्यातून काहीतरी ठोस हाती येईल असा विश्वास एनसीबीला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक एनसीबीच्याच कामावर प्रश्नचिन्ह उभे करत रोज खळबळजनक आरोप करत आहेत. आता तर मलिक यांनी बॉलीवूडकरांच फेवरेट टूरिंग डेस्टीनेशन असलेल्या मालदिवजचा हवाला देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे या बॉलीवूडचं मालदि्वजशी काय कनेक्शन आहे हे पाहणं गरजेचे आहे.

बॉलीवूडकरांच मालदि्वज फेवरेट डेस्टीनेशन 

- Advertisement -

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात देशांतर्गत प्रवासाबरोबरच आंतरराष्ट्रीय प्रवासही बंद होता. पण जसजशी कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली तसे कोरोना निर्बंद्धही शिथिल करण्यात आले. यात काही अटी व शर्थींवर आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासही मुभा देण्यात आली. यामुळे अनेक महिने घरात डांबून राहीलेल्या बॉलीवूडकरांनी निसर्गरम्य मालदिवजची वाट धरली. भारताचा शेजारील देश ही जरी मालदि्वजची ओळख असली तरी भारताबरोबरचे त्याचे मैत्रीपूर्ण संबंध याचा देखील त्यात समावेश होतो. शिवाय कोरोनाकाळात इतर परदेशी देशांच्या पर्यटनाच्या तुलनेत मालदि्वजने कोरोनाचे निर्बंध्द काटेकोरपणे पाळत पर्यटन क्षेत्र पर्यटनासाठी खुली केली. तसेच कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येताच भारत आणि मालदि्वजने एअर बबल, ट्रान्सपोर्ट बबल संकल्पना राबवत आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू केली. यामुळे पर्यटनाबरोबरच नोकरी, शिक्षण आणि वैद्यकीय उपचारासाठी नागरिक दोन्ही देशात प्रवास करू लागले.

ही मालदि्वजची एक बाजू जरी असली तरी नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे वसुलीसाठी मालदि्वजचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. मलिक यांनी केलेल्या या आरोपामुळे याप्रकरणात मालदि्वजचे नाव का यावे असा प्रश्न सामान्यांना पडला आहे. तशातच बॉलीवूडकरांचे उठ सुठ मालदि्वजला जाणेही संशय़ाच्या भोवऱ्यात आले आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कॅटरिना कैफ, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, अदर जैन, इली इवरम, वरून धवन, तापसी पन्नू, रकुल प्रीत सिंग, अंगद बेदी आणि नेहा धूपिया यांनी मालदि्वज पर्यटन केले होते. त्यानंतर काजल अग्रवाल आणि गौतम किचलू यांनीही हनिमूनसाठी मालदिवज गाठले. तर आलिया रणबिरही  वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदि्वजलाच गेले होते. अशा अनेक सेलिब्रिटीजनी या कोरोनाकाळात पर्यटनासाठी मालदिवज निवडले. अजूनही मालदि्वजला बॉलीवूडकरांची ये जा सुरूच आहे.

- Advertisement -

 

मालदिवज्  ड्रग्जचा अड्डा
मालदि्वज जेवढे पर्यंटनासाठी प्रसिद्ध आहे तेवढेच ड्रग्जच्या काळ्याबाजारासाठीही प्रसिद्ध आहे.  यामुळे मालदिवजला आता ड्रग्ज हब म्हणूनही ओळखले जाते. याचपार्श्वभूमीवर विचार करता बॉलीवूडकरांच्या मालदिवज टूरिंगमागचे हे तर एक कारण नाही ना असा प्रश्न आता सामान्यांच्या मनात येत आहे. मालदिवज आणि कोलंबोमधून ड्रग्ज तस्करी करण सोप आहे. आज मालदिवजमध्ये हेराॅईन आणि ब्राऊन शुगर घेणारे घराघरामध्ये आहेत. १० पैकी १ व्यक्ती ही अमली पदार्थांच्या व्यसनाचे बळी ठरलेली आहे. मालदिवजची राजधानी असलेल्या मालेमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचा आकडा सर्वाधिक आहे. वयाच्या ९ व्या वर्षापासूनच येथील मुलं ड्रग्जचे सेवन करत असून आपल्या देशात ज्याप्रकारे गुटखा, तंबाखू, पानमसाला सहज उपलब्ध होतो .तसेच मालदि्वजमध्ये हेरॉईन आणि ब्राऊन शुगर उपलब्ध होते. यामुळे येथे घराघरात ड्रग्ज आढळल्यास नवल नाही. याचकारणामुळे येथील तरुण पीढी दिवसेंदिवस ड्रग्जच्या विळख्यात अडकत असून शाळांपेक्षा व्यसन मुक्ती केंद्राची संख्या येथे वाढत आहे. रोजगारीच्या संधी पर्यटनामधूनच उपलब्ध होत असल्याने पर्यटकांना ड्रग्ज सहज उपलब्ध करून देणारी टोळकी येथे पावलापावलावर आहे. यामुळे कोरोनाकाळातही मालदि्वजमध्ये पर्यटकांचा छुपा प्रवास सुरू होता.

फोटो सौजन्य- गुगल

त्यातच मालदिवज जगभरातील नागरिकांचं आवडतं पर्यटनस्थळ असल्याने पर्यटनाच्या माध्यमातूनही येथे ड्रग्जची तस्करी होते. यात येथील स्थानिक पोलिसच नाही तर येथील सरकारी कर्मचारी, परदेशी नागरिकांचही रॅकेट सक्रीय असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. मालदिवजचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब यांच्यावरही ड्र्ग्ज रॅकेट चालवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे बॉलीवूड सेलिब्रिटीज मालदि्वजलाच फक्त फिरायला जातात की ड्रग्जचा आनंद घ्यायला हे येत्या काही दिवसात समोर येईलच आणि नवाब मलिकांच्या आरोपाचे दूध का दूध और पाणी का पाणी होईल का याची वाट पाहावी लागणार आहे.

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -