घरताज्या घडामोडीCIDCO Lottery : खूशखबर ! दिवाळीत परवडणाऱ्या दरात मिळणार नवी मुंबईत घर...

CIDCO Lottery : खूशखबर ! दिवाळीत परवडणाऱ्या दरात मिळणार नवी मुंबईत घर ; सिडकोकडून ४९०० घरांसाठी लॉटरी

Subscribe

अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध असतील.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने नवी मुंबईत कोरोना योद्ध्यांना घरं उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोरोना योद्ध्यांना (Corona Warriros) नवी मुंबईत स्वस्तात घरे मिळणार आहेत. कोरोना योद्ध्यांच्या कामगिरीबाबत कृतज्ञता म्हणून सिडकोच्या माध्यमातून त्यांच्यासाठी घरे राखीव ठेवण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. या आदेशानुसार सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेत कोरोना योद्ध्यांसाठी राखीव घरे ठेवण्यात आली आहेत. दिवाळीच्या काळात तुम्ही नवी मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी चालून आली आहे. सिडकोकडून नवी मुंबईत लवकरच ४९०० घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे उपलब्ध असतील.

या योजनेअंतर्गत सिडकोकडून संपूर्ण महाराष्ट्रातील करोनायोद्धे व गणवेशधारी कर्मचाऱ्यांकरिता नवी मुंबईच्या पाच नोड्समध्ये ४४८८ घरे उपलब्ध करून देण्यात येतील. नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली व द्रोणागिरी या पाच परिसरांमध्ये ही घरे असतील. एकूण ४४८८ घरांपैकी १०८८ घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी, ईडब्लूएस आणि उर्वरित ३४०० घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आहेत. तसेच, वैधानिक तरतुदींनुसार काही घरे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दिव्यांग प्रवर्गांकरिता राखीव आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – पर्यटकांसाठी खूशखबर : सिलेंडरचे दर वाढले तरी अलिबागमध्ये हॉटेल व्यवसाय महागणार नाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -