घरफिचर्सचतुरस्त्र ग्रंथकार चिंतामण वैद्य

चतुरस्त्र ग्रंथकार चिंतामण वैद्य

Subscribe

वैद्यांनी १८८९ ते १९३४ या काळात विपुल लेखन केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. यांपैकी थोडेच लेखन ग्रंथरूपाने संगृहीत झाले. इंग्रजी (९) व मराठी (२०) अशा त्यांच्या एकूण प्रकाशित ग्रंथांची संख्या एकोणतीस आहे.

चिंतामण विनायक वैद्य हे एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक – मीमांसक व चतुरस्त्र ग्रंथकार. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १८६१ रोजी कल्याण, ठाणे जिल्हा येथे झाला. त्यांचे वडील विनायकराव कल्याणला वकिली करीत. चिंतामणरावांचे शिक्षण कल्याण तसेच मुंबईच्या एल्फिन्स्टन स्कूल व एल्फिन्स्टन कॉलेजात झाले. एम.ए. (१८८२) आणि एल.एल. बी. (१८८४) झाल्यानंतर काही काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे मुनसफ म्हणून व नंतर ठाण्याच्या कोर्टात वकील म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर उज्जैन येथे न्यायाधीश पदावर ते रुजू झाले. पुढे ग्वाल्हेर संस्थानच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली (१८९५-१९०४). सेवानिवृत्तीनंतर १९०५ सालापासून लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून ते कार्य करू लागले. राष्ट्रीय शिक्षणाचे काम त्यांनी आस्थेने व निष्ठेने केले. कोलकाता, सुरत आदी काँग्रेस अधिवेशनांना ते टिळकांबरोबर गेले. टिळकांच्या पश्चात वैद्यांनी म. गांधीजींचा मार्ग अनुसरला. वेगवेगळ्या समित्यांवर काम करणे, अहवाल लिहिणे ही कामे त्यांनी गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली केली.

वैद्यांनी १८८९ ते १९३४ या काळात विपुल लेखन केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. यांपैकी थोडेच लेखन ग्रंथरूपाने संगृहीत झाले. इंग्रजी (९) व मराठी (२०) अशा त्यांच्या एकूण प्रकाशित ग्रंथांची संख्या एकोणतीस आहे. महाभारत एक क्रिटिसिझम (१९०४), संक्षिप्त महाभारत (१९०५), रिडल ऑफ रामायण (१९०६), अबलोन्नतिलेखमाला (१९०६), एपिक इंडिया (१९०७), मानवधर्मसार-संक्षिप्त मनुस्मृति (१९०९), दुर्दैवी रंगू (१९१४), श्रीकृष्ण चरित्र (१९१६), महाभारताचा उपसंहार (१९१८), हिस्टरी ऑख मिडिव्हल हिंदु इंडिया ( ३ खंड, १९२१, १९२४ व १९२६), संस्कृत वाङ्मयाचा त्रोटक इतिहास (१९२२), मध्ययुगीन भारत (तीन खंड, १९२५), गझनीच्या महमूदाच्या स्वार्‍या (१९२६), ए हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर (१९२६), वैद्यांचे ऐतिहासिक निबंध (१९३१), शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज (१९३१), हिंदू धर्माची तत्त्वे (१९३१), महाभारताचे खंड-सभापर्व, विराटपर्व, उद्योगपर्व (१९३३-३५), संयोगिता नाटक (१९३४). इत्यादी काही उल्लेखनीय ग्रंथ आहेत.

- Advertisement -

संशोधनात्मक चिकित्सक लेखन करताना त्यांच्या वाचनात नागेशराव बापट यांची पानिपतची मोहीम ही कादंबरी पडली. त्यावर त्यांनी घणाघाती टीका केली आणि दुर्दैवी रंगू ही ऐतिहासिक कादंबरी त्याच विषयावर एक आव्हान म्हणून लिहिली. पानिपतच्या युद्धाची हकीकत या दृष्टीने यात उत्तम विवेचन साधले आहे. वैद्यांनी प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासावर विविधांगी व प्रचंड संशोधन करून ग्रंथलेखन केले. त्यापैकी हिस्टरी ऑफ मिडिव्हल हिंदु इंडिया हा त्रिखंडात्मक ग्रंथ प्रथम इंग्रजीत लिहिला आणि त्यानंतर त्याचा मराठी अनुवाद तीन खंडांत मध्ययुगीन भारत या नावाने प्रसिद्ध केला. पुणे येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते (१९०८). अशा या महान ग्रंथकाराचे २० एप्रिल १९३८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -