घरफिचर्सडॉक्टर, अ‍ॅक्टर आणि माणूस...

डॉक्टर, अ‍ॅक्टर आणि माणूस…

Subscribe

डॉक्टरांच जगणं आणि त्यांचा कलाप्रवास मोठा विलक्षण आहे. कधी कधी गिरीवनात त्यांच्या विकेंड्स फ्रेंड्सच्या समुहात बसून त्यांच्यासोबत आणलेलं कासव ते कुरवाळत बसतात. कधी मुलाखत तर कधी गप्पा गोष्टीमध्येही मिश्किली दिसते. अशा डेअरिंगबाज नवकोट नानांची घाशीरामला दिलेली कोतवाली एका वाक्यात घे घाशा....दिली...दिली तुला कोतवाली...एवढ्या मोठ्या वाक्यानंतर येणारं छद्मी हास्य सगळ्या नाटकाचा गाभा धरून ठेवणारं असतं.

कलास्पर्श

डॉ. मोहन आगाशे यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला. तो दिनांक ५।११।२०१८ रोजी सांगली येथे रंगभूमी दिनानिमित्तच्या कार्यक्रमात सायंकाळी ५ वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिर सांगली येथे प्रदान करण्यात येणार आहे. मागील ५४ वर्षे नाट्यक्षेत्रात असलेल्या अखिल भारतीय महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समिती, सांगली या संस्थेने हा पुरस्कार जाहीर केला आहे. मराठी, हिंदी सिनेसृष्टी आणि रंगभूमीवर इतकी वर्षे सातत्याने वावरणार्‍या डॉक्टरांबद्दल आजही मराठी नाट्यरसिकाला कुतूहल आणि आपुलकी आहे.

त्यांनी केलेली नाटके, मालिका, सिनेमे इंटरनेटवर पाहाता येतातंच की, पण जुन्या मंचावरील गाजलेल्या नाटकांच्या त्या जीवंत अनुभवाचं काय. तो इंटरनेटवर कसा मिळेल? मग आठवतात ते घाशीरामचे दिवस, डॉक्टरांचे पदलालित्य आणि मिश्कील नजर , त्यातून आता प्रश्न येतो की, त्यांच वागणं त्यावेळी कसं होतं. बरं त्यांचे सहकलाकार डॉक्टरांबद्दल त्यावेळी आणि आजही काय बोलत असतील? या प्रश्नांची उत्तरं शोधणं महत्वाचं होतं.

- Advertisement -

डॉक्टरांबद्दल कला दिग्दर्शक विनोद गुरुजी म्हणतात… मी कायद्याचं बोला मध्ये भों.डे. वकिलाचं काम केलं. तेव्हा डॉ. आगाशेंच्या संपर्कात आलो. ते हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहेच. त्यांनी कधीच स्वतःतल्या अभिनेत्याला स्वतःतल्या माणसावर वरचढ होऊ दिलं नाही. मोठा रंगकर्मी, कलाकार असलं काही त्यांच्या वागण्याबोलण्यात कधीच आलं नाही. हसत खेळत दिवस कसा चांगला जाईल, याचा विचार त्यांचा असतो. आघाडीचे नटवर्य उदय सबनीस म्हणतात डॉक्टरांबरोबर काम करायला कधी मिळतंय, याची मी वाट पाहतोय. गेली अनेक वर्षे मी त्यांचं काम पाहातोय,त्यांतून शिकतोय. त्या कामांच्या बारकाव्यांची नजाकत अभ्यासाने प्रकटावे या उक्तीप्रमाणे सखोल तयारीनिशी डॉक्टर भूमिका करतात.

तसंच वागणं त्यांच स्टेजवरही असतं. अनेक वर्षे परदेशात राहूनही मराठी प्रेक्षक व नाटकाची नाळ न सोडलेला कलाकार, गुंतता ह्यदय हे मधला अंध बाप जसा त्यांनी असा काही साकारला की ते डोळस आहेत यावर अविश्वास वाटावा. त्यामागे नक्कीच्या त्यांच्या डॉक्टरकीचा अभ्यास असेल किंवा नाटकात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची सवय. त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून कलाकाराला एक वस्तुपाठ मिळतो असे उदय सबनीस म्हणतात. त्यांच्या अनेक भूमिकांतून किंवा प्रत्यक्ष त्यांच्याकडूनही बरंच काही शिकायला मिळालं, मिळतं. शतरंज के खिलाडी पासून घाशीराम कोतवाल आणि काटकोन त्रिकोण पर्यंत त्यांच्याकडून माझं हे शिकणं सुरूच आहे. अभ्यासू आणि भूमिकेची सखोल माहिती घेणारे त्याउपरही भूमिकेला आणखी सुंदर करून ती मांडणारे डॉ. आगाशे आहेत.

- Advertisement -

अतिशय उच्च क्षमतेचा नट असल्याचं मत विघ्नेश जोशी यांनी डॉक्टरांविषयी मांडलं. त्यांच्या क्षमतेला पूर्ण न्याय देणारं काम अजून त्यांना करायचं आहे. असं जोशी म्हणतात. त्यासाठी ते बाल गंधर्वांच्या भूमिकांचं उदाहरण देतात. एकच बालगंधर्व व हेच नाथ हा माझा म्हणणारे अन्य नट यात जी तफावत दिसते किंवा नयनी लाजविल…असे इतरांनी म्हणणे आणि बालगंधर्वांनी सादर करणे यात जो फरक असतो तोच नेमका फरक जेव्हा डॉक्टरांची भूमिका समोर येते तेव्हा जाणवतो. नाहीतर दारव्हेकर, कानिटकर, राम गणेश गडकरी यांची भाषा सोप्या सहज लोकांपर्यंत पोहचवणारे मोहन आगाशेच.

नुसतंच पाठांतर नव्हे तर सहजता अंगी बाणवून वाचन, पठण, मनन करून हे साध्य होत नाही. मोठे बाबा ज्यांनी नातीच्या पाठीवर सहज ठेवलेला हात यातही अभिनयाच्या कित्येक छटा हा डॉक्टर आगाशेंचा सहजाभिनयच दाखवू शकतो. हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलंय.

अशीच मतं डॉक्टरांबद्दल थिएटर अकादमी पुणेची जुनीजाणते सभासद नट मंडळी आणि आताची संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, सुमित्रा भावे, गिरीश ओक यांची आहेत. डॉक्टरांनी मिळवलेल्या १९९० साली पद्मश्री, १९९६ साली बेस्ट खलनायक म्हणून फिल्मफेअर, २००२ ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मनी अशा अनेक पुरस्कारांची यादी आहेच.

डॉक्टरांच जगणं आणि त्यांचा कलाप्रवास मोठा विलक्षण आहे. कधी कधी गिरीवनात त्यांच्या विकेंड्स फ्रेंड्सच्या समुहात बसून त्यांच्यासोबत आणलेलं कासव ते कुरवाळत बसतात. कधी मुलाखत तर कधी गप्पा गोष्टीमध्येही मिश्किली दिसते. अशा डेअरिंगबाज नवकोट नानांची घाशीरामला दिलेली कोतवाली एका वाक्यात घे घाशा….दिली…दिली तुला कोतवाली…एवढ्या मोठ्या वाक्यानंतर येणारं छद्मी हास्य सगळ्या नाटकाचा गाभा धरून ठेवणारं असतं. त्यानंतर अलगद फिरलेली वाक्यं आणि पावलांची बावन्न खणीकडे वळलेली दिशा हे फक्त एका नाटकासंबंधीचे संदर्भ. परंतु थोड्याफार फरकाने सर्व भूमिका साकार करताना डॉक्टरांची ही अभ्यासू वृत्तीही दिसून येते.

– सदाशिव कुलकर्णी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -