घरफिचर्सशिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ

शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ

Subscribe

स्वामी रामानंद तीर्थ यांचा आज स्मृतिदिन. स्वामी रामानंद हे स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, शिक्षणतज्ज्ञ, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर होते. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी कर्नाटकातील सिंदगी येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. रामानंदांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावी झाले. त्यांनी एका राष्ट्रीय विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा दिली आणि पुढे अमळनेर व पुणे येथील महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांसह बी. ए. व एम. ए. पदवी संपादन केली. त्यानंतर १९२६ मध्ये ना. म. जोशी यांच्या स्वीय सहाय्यकपदी ते रुजू झाले.

त्यामुळे आपाततः गिरणी कामगारांच्या लढ्यात ते सक्रिय सहभागी झाले. ना. म. जोशींनी स्वामीजींना कामगारविषयक विधेयकाची माहिती घेण्यासाठी ऐन हिवाळ्यात दिल्लीला पाठविले. नंतर त्यांनी अध्यात्माची कास धरली. आपल्या जन्मनावाचा त्याग करून भिक्षुकी अंगीकारली. त्यानंतर हिप्परगा (तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद) येथे लखनौस्थित स्वामी नारायण यांच्याकडून संन्यासदीक्षा घेऊन ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. त्यांनी हिप्परगा येथे १९३० मध्ये राष्ट्रीय विचारांच्या प्रचारार्थ शिक्षण संस्था काढली. सहा-सात वर्षे राष्ट्रीय बाण्याने हे कार्य केल्यानंतर ते १९३५ मध्ये सक्रिय राजकारणात सहभागी झाले आणि याच सुमारास आंबेजोगाई येथे योगेश्वरी नूतन विद्यालयात शिक्षकाची नोकरी धरली. पुढे ते मुख्याध्यापकही झाले.

- Advertisement -

नंतर त्यांनी नांदेड येथे १९५० मध्ये नांदेड एज्युकेशन संस्थेची स्थापना केली आणि नांदेड शहरात पीपल्स कॉलेज काढले. त्यानंतर त्यांनी १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकांत गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढवून संसदेत प्रवेश केला. १९५३ मध्ये अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनी हैदराबाद राज्याच्या विभाजनाचा प्रश्न प्रभावीपणे मांडला. अशा या कर्तृत्ववान शिक्षणतज्ज्ञाचे 22 जानेवारी 1972 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -