घरमनोरंजनPriyanka Chopra : Good news! 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा सरोगसीद्वारे बनली आई

Priyanka Chopra : Good news! ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा सरोगसीद्वारे बनली आई

Subscribe

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्रा आई झाली आहे. याची माहिती प्रियांका आणि निक जोनसने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून दिली आहे. सरोगसीद्वारे प्रियांकाने आई होण्याचा आनंद घेतला आहे. सोशल मीडियावर प्रियांकाने ही माहिती देत प्रत्येकाने आपली गोपनीयता राखण्याचे आवाहन केलेय. प्रियांकाने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे.

सोशल मीडियावर माहिती देताना प्रियांका चोप्रा म्हणाली की, ‘आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, आम्ही सरोगसीच्या माध्यमातून मुलाचे स्वागत करत आहोत. आम्ही आदरपूर्वक आवहन करतो की, या खास प्रसंगी चाहत्यांना गोपनीयता बाळगावी. कारण आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. आभार’. ही गूड न्यूज शेअर होताच प्रियांका आणि निकचे सर्वजण अभिनंदन करत आहेत. प्रियांकाच्या या पोस्टवर आता चाहत्यांपासून अनेक सेलिब्रिटी कमेंट करत शुभेच्छा देत आहेत. तर प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराकडूनही दोघांचे अभिनंदन केले जातेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

- Advertisement -

प्रियांका चोप्राने 2018 साली अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केले. राजस्थानमधील जोधपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. आता दोघांच्या लग्नाना तीन वर्षे पूर्ण झाले. निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका चोप्रा अमेरिकेतच राहते. मध्यंतरी सोशल मीडियावर प्रियांकाने पती निक जोनसचे आडनाव हटवल्याने दोघं विभक्त झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र या चर्चा केवळ अफवा होत्या.

- Advertisement -

प्रियांका चोप्रा ही आज बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. चमकदार अभिनयासाठी तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 2016 मध्ये, भारत सरकारने प्रियांका चोप्राला पद्मश्री देऊन सन्मानित केले तकर टाइम मासिकाने तिला जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून घोषित केले. फोर्ब्सने तिला जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीतही स्थान दिले आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -