घरफिचर्सपानी कसं असतं

पानी कसं असतं

Subscribe

मानवी शरीराचा प्रत्येक अवयव आणि स्नायुंमध्ये पानी असते. शरीरातील सर्वात मजबूत समजल्या जाणार्‍या हाडांमध्येही 22 टक्के पाणी असते. आपल्या दातांमध्ये 10 टक्के, त्वचेमध्ये 20 टक्के, मेंदूमध्ये 74.5 टक्के, स्नायूंमध्ये 75.6 टक्के आणि मानवची रक्तामध्ये 83 टक्के पाणी असते.

पानी रे पानी तेरा रंग कैसा
’प्रौढ पुरुषाच्या शरीरात 65 टक्के तर बाईच्या शरीरात 52 टक्के पाणी असतंय मन’
टीप टीप बरसा पानी
’आपल्या गावाकडं या वर्षी पाण्यानं लय मोठा धोका दिलाय …यंदापन ट्रेन सोडावं लागन पाण्याची’
ठंडा ठंडा पानी
हमारे उधर पानी ज्यादा बरसकर प्रॉब्लेम और तुम्हारे यहा पानी ना बरसने से प्रॉब्लेम
पानी पानी रे खारे पानी रे
बिना सीलची पानी बॉटल घ्यायचीच नाही बाबा! त्यातल्या पाण्याच्या शुद्धतेची खात्री नाही
आज ब्लु है पानी पानी
आपल्या बिल्डिंगमध्ये नळ चोवीस तास पानी सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास
पाण्याच्या टँकरचा धंदा त्या शिवाय कसा चालेल
के संग तेरा पानियो सा पानियो सा बेहता रहु
नमामि गंगे, ते गंगेचं पाणी साफ करु इच्छिणारे ऍक्टिव्हिस्ट गेले मन रे … ठखझ
पाणीच पाणी चोहीकडे
गाणं ? पाण्यावरची कविता ज्वलनशील असतीय
असं
व्हय
बरं … गाणं आठवतो
मानवी शरीराचा प्रत्येक अवयव आणि स्नायुंमध्ये पानी असते. शरीरातील सर्वात मजबूत समजल्या जाणार्‍या हाडांमध्येही 22 टक्के पाणी असते. आपल्या दातांमध्ये 10 टक्के, त्वचेमध्ये 20 टक्के, मेंदूमध्ये 74.5 टक्के, स्नायूंमध्ये 75.6 टक्के आणि मानवची रक्तामध्ये 83 टक्के पाणी असते.
पाण्याचं गाणं ?
आठवणा गेलंय
मानवाच्या उत्क्रांतीसाठी , भरभरटीसाठी व प्रगतीसाठी पाणी आवश्यकच
पाण्याचं गाणं ?
मळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जातं
शरीरातील पाण्याच्या 10 टक्कयाहून जास्त पाणी कमी झाले तर कोणताच सजीव जिवंत राहू शकत नाही
आता पाण्याचे गाणे आठ्वना गेलेत …
पाण्याची कविता चालन का? व्हाट्सअप वर आलीय
पाणी कसं असतं
ती नको ती आपल्या सिलॅबशीतुन बादाय
समुद्राला पिवळं करणारं तांबडं करणारं पानी चालन जांभळं नको ते पानी ज्वलनशील राहतंय.
मी लिहलेलं वाचून दाखिवलालतो
विषय प्यायच्या पाण्याचा होता तिथंपर्यंत ठीक होतं, पर कवितेतल्या पाण्याबद्दल आमच्या व्होल लोकलच्या डब्ब्यात कुणाला माहित होतं?
लिहणार्‍यानं पाण्यावरची कविता लिहली.
कुणाला आवडली… कुणाला नाही आवडली.
काहींनी कवीला शिव्या दिल्या
कवींनी कवीला सपोर्ट केला …
लिहणार्‍या कवीनी माफी मागितली
वादावर पानी पडलं
अशा रीतीने पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरे सफळ संपूर्ण
कृष्णार्पण सोडा पानी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -