घरफिचर्सप्रतिसाद ...

प्रतिसाद …

Subscribe

थेंब… थेंब….! पाणी आणि त्याचे महत्त्व
या भूतलावर ७० ते ७२ टक्के जलसाठे आहेत, तरीही या भूतलावरील लोकांना, तसेच पशू, पक्ष्यांना पाणी मिळत नाही. झाडवेलींना पण पाणी मिळत नाही. शेतीतून उत्पादन काढावयाचे तर विहिरींना पाणी नाही. धरणे कोरडी आहेत. तलाव कोरडे पडलेत. जिकडे… तिकडे राज्यभर पाण्यासाठी ओरड होत आहे. पाण्यासाठी दिवसभर पायपीट होत आहे. पाण्यासाठी हाणामार्‍याही मोठ्या प्रमाणात होत आहेत. कुटुंबातील घरासाठी पाण्याचा अतिशय जवळचा संबंध असणारी मायमाऊली हंडा मोर्चा काढून थकलेली आहे. तरीही पाणी नाही. निसर्ग कोपला, पाऊस पुरेसा पडला नाही. वरुण राजाने धोका दिला. असा आपण दोष देत बोलत असतो. मात्र, पाण्याच्या थेंबाचे महत्त्व आम्ही अद्यापही जाणले नाही, पाणी हे जीवन आहे हेसुद्धा आम्ही समजून घेतलेले नाही. त्यामुळेच पाण्याचे भीषण संकट ओढवलेले आहे. यापुढेही पाण्याला आम्ही जाणले नाही किंवा पाण्याची सारखी उधळपट्टी करून पाणी वाया घालवित राहिलो तर काळ आपल्याला माफ करणार नाही.पावसाचे पाणी साठविण्याच्या नवनव्या पद्धती विकसित करून त्यांची सर्वांनीच अंमलबजावणी केली तरच पाण्याचे पुढील दुर्भिक्ष टळेल. पाणी वापरावर निर्बंध लावून घ्या…. पाणी केव्हा वापरायचे, कसे वापरायचे… ? याबाबत आज प्रत्येकाने पाणी वापराचे निर्बंध स्वतःला लावूनच पाणी वापरावे. जास्तीत जास्त पाण्याची बचत कशी होईल. याबाबत दक्ष रहावयास हवे.पिण्यासाठी घोटभर पाणी हवे आणि ग्लासभरून दिलेले पाणी एक घोट पिऊन फेकून देण्यात येत असेल तर हे कटाक्षाने टाळावे. आंघोळीचे पाणी, कपडे धुण्याचे पाणी, भांडी धुण्याचे पाणी साठवा व त्याचा उपयोग झाड वेलीसाठी फरशी धुण्यासाठी केल्यास पाण्याची फार मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते व पाण्याचा योग्य वापरही होऊ शकतो. -श्री. शिवाजी विठ्ठल चौगुले,कल्याण, चिंचपाडा

भाऊचा धक्क्यावरील बसेस पुन्हा सुरू करा
मुंबईतून समुद्रमार्गे कोकणात जायच्या भाऊचा धक्का येथे पोहोचण्यासाठी वा तिथून मुंबईत येण्यासाठी बीएसटी बसेस हा एकमेव मार्ग अस्तित्वात होता. धक्का कमकुवत झाल्याचे निमित्त बीपीटीच्या अधिकार्‍यांनी केल्याने जड वाहनांसाठी हा धक्का बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. खरे तर याच धक्क्याला लागून कसारा हे मासेमारीचे बंदर बांधण्यात आले आहे. हे बंदर थेट मायलेट बंदराला जोडण्यात यावे, अशी अनेक वर्षांची प्रवाशांची मागणी आहे. ती पूर्ण करण्यात आली नाहीच. उलट याच धक्क्यावर मासळीचे मोठमोठे ट्रक खुलेआम सोडले जात होते. या ट्रकमधील मासळीच्या पाण्याचा परिणाम धक्क्याच्या बांधकामावर होणे स्वाभाविक आहे. यामुळे अशा ट्रकना धक्क्यावर येण्यासाठी मज्जाव घालण्याचा निर्णय योग्य आहे, पण धक्क्यावर येण्यासाठी सामान्यांकरता एकमेव साधन असलेल्या बीएसटीच्या बसेस बंद करण्याची आवश्यकता अजिबात नाही. खरे तर धक्क्यावर सामान्यांना यायचे असल्यास त्यासाठी येणार्‍यांना टॅक्सीशिवाय कोणतेही साधन नाही. टॅक्सीचा प्रवास हा सामान्यांना न परवडणारा असल्याने बीपीटीने बसेससाठी धक्क्याचा मार्ग मोकळा केला पाहिजे. -सुयश पाटील,रेवस-अलिबाग

- Advertisement -

महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुरायाची नगरी आणि महाराष्ट्रातील भाविकांचे सर्वात मोठे तीर्थस्थान असलेल्या पंढरपुरात बडव्यांनी प्रति विठ्ठलाचे मंदिर स्थापन केले असल्याचे वर्तमानपत्रात वाचायला मिळाले सोशल मीडियावरदेखील याबाबत खूप चर्चा रंगली परिणामी जनमानस आणि भोळ्या भाविक मंडळीत आणि वारकरी वर्गातही संभ्रम निर्माण झाला, परंतु हे मंदिर प्रति विठ्ठलाचे मंदिर नसून ते बडव्यांनी त्यांच्या खाजगी जागेत बांधलेले खाजगी मंदिर आहे असे समजते. सध्या कोणत्याही तीर्थक्षेत्र किंवा देवतांविषयी नवीन मंदिर निर्माण करून त्याला दुय्यम दर्जाचे प्रती अमुक तमुक असे नामकरण करण्याचे प्रस्थ वाढले आहे त्यातून या देवस्थानला वेगळी प्रसिद्धीही मिळते तशी अनेक प्रति तीर्थक्षेत्रे महाराष्ट्रात प्रचलित आहेत, परंतु प्रतिविठ्ठल मंदिर स्थापन झाल्याची बातमी प्रसार माध्यमातून झळकली त्यामुळे एक वेगळीच चर्चा निर्माण झाली ती निरर्थक व अनाठायी आहे कारण युगे अठ्ठावीस विठेवर उभा अशा सर्वमान्य विठुरायाला प्रति या संकल्पनेत बसवणे हे वारकरी आणि संतविचारांना अभिप्रेत नाही कारण वारकरी विचारधारा ही संत विचारधारेवर आधारित आहे जो सगुणही नाही आणि निर्गुणही नाही असा निराकार विठोबा प्रति विठोबा या शब्दात बसवल्यास ते कोणालाही रुजनार नाही.
-श्याम बसप्पा ठाणेदार ,दौंड जिल्हा पुणे 9922546295

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -