घरफिचर्ससारांश..छुने तो दे सांसे जरा !

..छुने तो दे सांसे जरा !

Subscribe

नायक-नायिकेच्या मनातल्या प्रेम भावनेचं सुतोवाच करणारे शब्द, छुने तो दे सांसे जरा. हे शब्द केवळ प्रेमाचे रंग उधळत नाहीत तर त्याही पुढे जाऊन प्रणयक्रीडेचा आविष्कारही संयतपणे घडवतात. एकमेकांच्या श्वासांना स्पर्श करत मोहरून जाण्याची उत्कट इच्छा. ती दोघांच्याही देहबोलीतूनही प्रकट झालीये. एकमेकांच्या मनातले गूज ओठांनी ओठांना सांगण्याची अधीरता नि आसोसी थेटपणे व्यक्त केलीये. मीलनाच्या या घडीचा पुरेपूर आनंद नि उपभोग घ्यायला आतुर झालेले हे प्रेमीजीव एकमेकांना आर्जवे करताहेत.

निर्माता राहुल सुगंध आणि दिग्दर्शक संजय छेल यांचा ‘खूबसूरत’ हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटात उर्मिला मातोंडकर, संजय दत्त,ओम पुरी, फरीदा जलाल आणि परेश रावल प्रमुख भूमिकेत होते. ही एक विनोदी प्रेम कहाणी होती. यातली बहोत खूबसूरत हो… (अभिजित-नीरजा पंडित), आजमाले ये फोर्मुले… (अभिजित- श्रद्धा पंडित), मै अधुरी सी एक उदासी हूं… (अनुराधा पौडवाल), आ ना जरा पास तो आ… ( कुमार सानू- अनुराधा पौडवाल), ए शिवानी तू… (श्रद्धा पंडित-संजय दत्त), मेरा एक सपना है … (कविता कृष्णमूर्ती-कुमार सानू), घुंघट मे चांद होगा … (कविता कृष्णमूर्ती-कुमार सानू), बरसे क्यो बरसात… (संजीवनी भेलांडे-नारायण परशुराम), गश खा के हो गया… (सुखविंदर सिंह) ही गाणी श्रवणीय आहेत. इथं उल्लेखलेली पहिली चार गाणी गुलजारची तर नंतरची चार संजय छेल यांनी लिहिलीयत. शेवटचं गाणं गायक सुखविंदर सिंहने लिहिलंय. ही सर्व गाणी जतीन-ललित यांनी संगीतबद्ध केली आहेत. यातल्या गुलजारच्या युगलगीताचा आस्वाद घेऊ या…

आना जरा, पास तो आ
छुने तो दे सांसे जरा
होंठो से तू, होंठो तले
शहद भरा, रस टपका
आना जरा…

- Advertisement -

बारिशे गुनगुनाए तो
ख्वाहिशे जाग जाए तो
इस पाजी दिल को कैसे समझाए
तू भी तो कभी, समझा जरा
आना जरा पास तो…
रात भर सोयी भी नही
आज तो रोई भी नही
दिल की शैतानी अच्छी लगती है
तू भी तो नादां मुझको मना
आना जरा पास तो…

या गाण्याच्या सुरुवातीचा संगीतकार जतीन-ललित यांच्या चिरपरिचित शैलीतला इंट्रो पिस छानच. चित्रपटातल्या नायक-नायिकेच्या मनातल्या प्रेम भावनेचं सुतोवाच करणारे शब्द. हे शब्द केवळ प्रेमाचे रंग उधळत नाहीत तर त्याही पुढे जाऊन प्रणयक्रीडेचा आविष्कारही संयतपणे घडवतात. एकमेकांच्या श्वासांना स्पर्श करत मोहरून जाण्याची उत्कट इच्छा. ती दोघांच्याही देहबोलीतूनही प्रकट झालीये. एकमेकांच्या मनातले गूज ओठांनी ओठांना सांगण्याची अधीरता नि आसोसी थेटपणे व्यक्त केलीये. मीलनाच्या या घडीचा पुरेपूर आनंद नि उपभोग घ्यायला आतुर झालेले हे प्रेमीजीव एकमेकांना आर्जवे करताहेत. कितीतरी दिवसांचा दुरावा, विरह, ताटातूट, एकाकीपण संपून हे क्षण ते अनुभवताहेत. यातला हरेक क्षण त्यांना भरभरून जगायचा आहे. त्यात हरवून जाण्याइतकं एकरूप, एकजीव आणि एकप्राण व्हायचं.

- Advertisement -

प्रेम आणि प्रणयाच्या सागरात त्यांना आकंठ बुडायचं आहे. अशा या मीलनाच्या समयी वर्षाराणीचं गुणगुणनं त्यांना वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातंय. म्हणून तनामनात अगणित इच्छा-आकांक्षा-अभिलाषा जाग्या होऊन तीव्रतेने उफाळून येताहेत. त्यांना आवर कसा घालायचा, सामोरं कसं जायचं असा यक्ष प्रश्न उभा आहे. या अनावर, बेभान मनाची कशी बरी समजूत घालावी, याची विवंचना दोघांना लागलीये. आधी असह्य विरहाने निद्रादेवी रुसून जायची. आता मात्र सहवास नि सोबतीमुळे झोपच येत नाहीये. पूर्वी वेळी-अवेळी नयनातून होणारं आसवांचं सिंचन आताशा मात्र थांबलंय. अलीकडे डोळे नि अश्रूंची गाठभेट दुर्लभ झाली आहे. मनाचं असं इकडे-तिकडे हुंदडत राहणं आवडायला लागलंय. मन उगीचच रुसायलाही लागलंय. माझ्या वेड्या जीवलगा, तुझ्याशिवाय कोण घालणार माझी समजूत? कधी काढतोयस माझी समजूत ? माझा रुसवा ? तू असा दूर नको ना जाऊस.. ये ना जवळ.. खूप निकट.. इतकं की, तुझ्या श्वासांत मला विरघळून जायचंय…
‘खूबसूरत’मधल्या दुसर्‍या एका गाण्यावर हा दृष्टिक्षेप:

मै अधुरी सी एक उदासी हू
मै ख्वाब हू या ख्वाब की प्यासी हू

भूरे भूरे बादल के पीछे से आए कभी
छिंटे उडाए कभी, पानी का गोला है,
आंखो में घोला है, कोई, मेरा कोई

खुशबू सी निकलती है तन से
जैसे कोई गुजरे बदन से
सांसो से उतरेगा शायद कभी-कभी वो
भूरे भूरे बादलों के पीछे से आए कभी
छिंटे उडाए कभी आंखो का सपना है,
बोले तो अपना है, कोई, मेरा कोई

आसमां का कोना एक उठा के
चूमता है निंद से जगा के
चांद से उतरेगा शायद कभी-कभी वो

भूरे-भूरे बादलों के, पीछे से आए कभी
छिंटे उडाए कभी,गरजे तो औरों का,
बरसे तो अपना हैं, कोई, मेरा कोई

मै अधुरी सी एक उदासी हूँ
मै ख्वाब हूँ, या ख्वाब की प्यासी हू …

एकट्या, एकाकी, अतृप्त स्त्रीची भावविव्हळ मनोवस्था चितारणारं हे गाणं. गाण्यातल्या नायिकेला कधी ती स्वत:च एक स्वप्न असल्याचं वाटतं तर कधी एखाद्या स्वप्नाची तहान तिला लागल्याचं ती सांगते. तिला कोणाची तरी प्रतीक्षा आहे. आस आहे. म्हणूनच ती वाट पाहतेय. तो चंद्रावरून येईल, भुरकट ढगांमधून पाण्याचे तुषार उडवत येईल, आकाशातला एखादा तुकडा घेऊन मला झोपेतून जागं करेल, श्वासांमधून अवतरेल असं तिला वाटत राहतं.. ती म्हणते, गडगडाट करत आला तर इतरांचा नि हळुवारपणे बरसत आला तर तिचा… तो येतोय म्हणून तिचं शरीर सुगंधित झालंय… एक अनामिक रितेपण तिला छळते आहे. ते दूर व्हावं यासाठी आळवणी करतेय.

पहिल्या गाण्यापेक्षा यात जास्त गुलजार टच जाणवतो. या गाण्यातल्या शब्दांना न्याय देण्यात गायिका आणि संगीतकार कमी पडल्याचं जाणवतं. हे गाणं आशा भोसले (किंवा निदान कविता कृष्णमूर्ती यांनी जरी ) गायलं असतं तरी यातला आशय नेमकेपणाने श्रोत्यांपर्यंत पोहचला असता! महान संगीतकार राहुलदेव बर्मन यांना आदर्श मानून जतीन-ललित यांनी आपली संपूर्ण कारकीर्द रचली, यशस्वी केली. पण जे काम आरडी-गुलजार यांनी एकत्रितपणे केलं ते त्यांना करता आलं नाही किंवा तशी त्यांना संधी मिळाली नाही. ते आणि गुलजार अभावानेच एकत्र आलेत. या सिनेमातलीही सर्व गाणी गुलजारची नाहीत. मात्र आरडीसारखं संगीत देणारे (की त्याच्या चालींची नक्कल करणारे? ) जतीन-ललित यांना इथं फारसा प्रभाव टाकता आला नाहीये. आरडीनंतर गुलजारची जोडी जमली ती फक्त विशाल भारद्वाज सोबतच. आरडीची नक्कल न करता त्याच्या शैलीचं कालानुरूप संगीत विशाल भारद्वाजने दिलंय.

–प्रवीण घोडेस्वार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -