घरफिचर्ससारांशफॅशन आणि ग्लॅमर

फॅशन आणि ग्लॅमर

Subscribe

फॅशन आणि ग्लॅमर या दोन्ही संकल्पनेत एक पुसट रेषा आहे. फॅशन ही विविध बाबींची असू शकते, तर ग्लॅमर ही आकर्षक दिससण्याशी संबंधित संकल्पना आहे.

– अर्चना दीक्षित

फॅशन आणि ग्लॅमर हे शब्द इतके सारखे वाटतात आणि ते बर्‍याच प्रमाणात सारखे आहेतदेखील बर का, पण तरीदेखील काहींना प्रश्न असतो की यातला फरक नेमका काय मी जोपर्यंत तुम्ही हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत खरच आपल्याला माहीत नसतं. मनात प्रश्न अनेक असतात या विषयावर, पण कुठे यात लक्ष घालायचं? असे काहीच म्हणणं असतं किंवा असं वाटतं की ठीक आहे ना असेल काही पण फरक आपल्याला काय, दोन्ही एकच. हे सगळे फॅशन इंडस्ट्रीतले शब्द. आपण कशाला जाणून घ्यायचं? असाही विचार असतो, पण जेव्हा त्यांचा मुलगा किंवा त्यांची मुलगी किंवा आप्तस्वकीय या इंडस्ट्रीत येतात. त्यावेळेस जेव्हा ते हे शब्द वारंवार कानावर ऐकतात, त्यावेळी मात्र त्यांना हा प्रश्न पडतो आणि ते जाणून घ्यायची उत्सुकतादेखील वाढते. असं बर्‍याच लोकांना वाटतं, पण हे नक्कीच दोन्ही एक नाही. हो या दोन्ही मध्ये बर्‍यापैकी फरक आहे. मी अगदी म्हणत नाही, जमीन आसमानाचा फरक आहे, पण एक थीन लाईन म्हणतो ना, तसा फरक मात्र या दोन्हीमध्ये आहे.

- Advertisement -

‘फॅशन’ ही फक्त कपड्यांशी संबंधित नाही, नसते. ‘फॅशन’ या संकल्पनेत अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. या संकल्पनेची व्याप्ती अगदी घराची अंतर्गत सजावट ते रोजच्या वापरातल्या छोट्या छोट्या गोष्टी अशी अमर्याद आहे. थोडक्यात फॅशन या शब्दाला अनेक अर्थ आहेत, असं आपण म्हणूयात. ही एका विशिष्ट गोष्टीची नसते, तर फॅशन ही अनेक गोष्टींची असू शकते. मग ती कपड्यांची असो, बॅगांची असो, सणासुदीची असो, सोशल वर्कची असो, अशा एक काय अनेक विषयांची फॅशन असू शकते.

तर ग्लॅमर म्हणजे लोकांना वाटतं छोटे छोटे कपडे घालणे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जास्तीत जास्त स्वतःला एक्सपोज करायचं, म्हणजे ग्लॅमर अशी एक विचारधारणा झाली आहे. त्यामुळे तू फॅशनेबल आहेस, पण ग्लॅमरस नाही असेही काही जण बोलत असतात. शिवाय कोणताही हिरो असो, हिरोीन असो, त्यांचं वयदेखील कमी असो किंवा जास्त असो, पण तेच ग्लॅमर असतील तर, त्यांची उदाहरणं देऊन आपल्याला सांगितलं जातं की पहा या वयातदेखील किती ग्लॅमर आहे, त्यामुळे ना आपलं वय विसरून मस्त ग्लॅमरस व्हायला पाहिजे.

- Advertisement -

मला असं वाटतं, फॅशन म्हणजे शालिनीता, सादगी. ती किती छानपणे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता. साध्या वेशात किंवा योग्य वेळी योग्य वेळी वेशभूषा करून तुम्ही कसे उठून दिसता, ती खरी फॅशन, पण यावर काहींचं वेगळं ही मत असू शकतं. छोटे छोटे कपडे घालून, थोडासा ठळक मेकअप करून, जरा काहीतरी इतरांपेक्षा वेगळा करणे आणि सगळ्यांमध्ये आपणच उठून दिसणार याला ग्लॅमर म्हणतात, असं माझं मत आहे. आता माझं मत सगळ्यांचे मत असलं पाहिजे, असं नाहीये. प्रत्येकाचं मत याविषयी वेगवेगळं असू शकतं. किंवा ते मी नेहमी म्हणते त्याप्रमाणे बरोबर की चूक हेदेखील व्यक्तीसापेक्ष आहे. कारण कोणते कपडे तुम्ही कुठे घालता, कसे घालता आणि त्यात तुम्ही कसे वावरता, लोकांसमोर या गोष्टीला जास्त महत्व दिले गेले पाहिजे. एखाद्या मोठ्या कार्यक्रमासाठी जर तुम्ही ग्लॅमरस कपडे घातले आणि ते घालून तुम्हाला वावरता येत नसेल, तर उगीचच ग्लॅमरस दिसण्याची गरज ती काय? जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी म्हणून किंवा एखादी प्रसिद्ध व्यक्ती म्हणून एखाद्या कार्यक्रमाला जात असता, उदाहरणार्थ लहान मुलांचा कार्यक्रम आहे, त्यासाठी जातात, तर त्यासाठी मला तरी वाटतं उगाच ग्लॅमरस कपडे घालायची काहीच गरज नाही. कारण ती मुलं तुमच्याकडे एक आदर्श म्हणून बघत असतात. त्यांनाही असंच वाटतं, असे छोटे छोटे कपडे घालणं म्हणजे एकदम कुल दिसणं अशी त्यांची विचारधारणा होते. हेच तुम्ही चांगले साधे कपडे घालूनदेखील त्या मोठ्या इव्हेंटमध्ये उठून दिसू शकता, तर काही ठराविक फंक्शन्स किंवा इव्हेंट्स अशी असतात, जिथे तुम्हाला ग्लॅमरस दिसण्याची गरज असते. अशा ठिकाणी तुम्ही तसे बनून गेलात तर ते योग्य. त्यामुळे आपण कोणत्या कार्यक्रमासाठी जात आहोत? त्या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? विषय काय आहे? त्या कार्यक्रमासाठी येणारे प्रेक्षक कसे आहेत, याविषयीदेखील आधी माहिती करून घेणे तितकेच गरजेचं असतं, पण मी म्हटलं तसं हे सगळं व्यक्तीसापेक्ष आहे एखादी गोष्ट खूप ठळक करून दाखवणं किंवा खूप ठळकपणे सांगणं म्हणजे ग्लॅमर. फॅशन आणि ग्लॅमर या दोन्ही शब्दांमध्ये एक अस्पष्ट रेषा आहे. ती समजून घेणे खूप गरजेचं असतं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -