घरफिचर्ससारांशकुमार सुपरहिट गाण्यांचा बादशाह

कुमार सुपरहिट गाण्यांचा बादशाह

Subscribe

२००४ साली आलेल्या ‘मुसाफिर’पासून ते सध्या सगळीकडे चर्चा असलेल्या ‘जवान’पर्यंत अनेक सिनेमात गीत लेखन केलेल्या कुमारची आपली अशी एक विशेष शैली आहे. पंजाबी मुळाचा गीतकार असलेल्या आणि तिथून स्ट्रगलसाठी स्वप्ननगरीत आलेल्या कुमारसाठी मुंबई म्हणजे ‘सह लोगे तो रह लोगे’ असं शहर आहे. पंजाबी भाषेचा वापर हिंदी गाण्यात अतिशय प्रभावीपणे आणि सामान्य हिंदी प्रेक्षकांनादेखील लक्षात येईल अशाप्रकारे करणारा गीतकार म्हणजे कुमार.

शब्द प्रत्येकाकडे असतात, काहीना काही ऐकून तो ते शब्द कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपल्याकडं असलेले शब्द कागदावर लिहिणारा प्रत्येक जण गीतकार नसतो. गीतकार होण्यासाठी विशेषतः सिनेमात गाणी लिहिण्यासाठी आवश्यक असतो, तो वेगळा विचार.. जो विचार येतो वाचनातून आणि निरीक्षणातून, जेव्हा हे जमतं तेव्हा उत्तम गाणं लिहिता येतं. चंद्रावर आजवर शेकडो गाणी लिहिली गेलीत, म्हणून काय चंद्रावर येणार्‍या गाण्यांची संख्या कमी झाली नाही, कारण प्रत्येक गीतकार त्या चंद्राचं वर्णन काही तरी वेगळं करतो, त्याला त्याच्या सुंदरतेत काही तरी नवीन दिसतं आणि तो तेच कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करत असतो.

हिंदी सिनेमात धूनवर गाणी लिहिणारे बरेच गीतकार आहेत आणि होते, पण यात एक गीतकार असा आहे ज्याने आजवर शेकडो सुपरहिट गाणी लिहिली आणि त्यातली ९० टक्के गाणी ही केवळ धुन ऐकून लिहिली आहेत. मुखडा कसा आहे पासून हुक लाईन काय आहे पर्यंतच्या प्रवासात ज्याच्या हुक लाईन त्याची खासियत बनल्या, तो गीतकार म्हणजे राकेश कुमार पाल ज्याला आपल्या हिंदी इंडस्ट्रीत गीतकार कुमार म्हणून ओळखलं जातं. पंजाबमधून मुंबईत स्ट्रगल करण्यासाठी आलेल्या या गीतकाराने आपला पंजाबी फ्लेवर जोपासत आणि ज्या इंग्रजीची मनात भीती होती, तिचाच वापर करत शेकडो सुपरहिट गाणी हिंदी सिनेमाला दिली आहेत. स्क्रीनप्ले पुढे नेणारी सर्वोत्तम गाणी लिहिण्यापासून ते सिनेमा फ्लॉप झाला तरी हिट होणारी डान्स नंबर लिहिणारा गीतकार, ज्याने स्वतःला समीर आणि आनंद बक्षीचा फॅन मानलं, पण आज त्याची स्वतःची गाणी लिहिण्याची कुमार स्टाईल जन्माला आली, असा गीतकार म्हणजे कुमार. सिनेमातलं गाणं हे एलआईसीच्या पॉलिसीसारखं म्हणजेच सिनेमा के साथ भी सिनेमा के बाद भी असं पाहिजे, तरच ते गाणं हिट होतं, म्हणून गाणी लिहिताना आजूबाजूला काय चाललं आहे? लोकांना नेमकं काय आवडतं? याचा विचार करूनच गाणं लिहावं, असं केलं तर गाणं नक्कीच लोकांच्या ओठावर कायम राहतं, असं कुमारला नेहमी वाटतं.

- Advertisement -

२००४ साली आलेल्या ‘मुसाफिर’पासून ते सध्या सगळीकडे चर्चा असलेल्या ‘जवान’पर्यंत अनेक सिनेमात गीत लेखन केलेल्या कुमारची आपली अशी एक विशेष शैली आहे. पंजाबी मुळाचा गीतकार असलेल्या आणि तिथून स्ट्रगलसाठी स्वप्ननगरीत आलेल्या कुमारसाठी मुंबई म्हणजे ‘सह लोगे तो रह लोगे’ असं शहर आहे. पंजाबी भाषेचा वापर हिंदी गाण्यात अतिशय प्रभावीपणे आणि सामान्य हिंदी प्रेक्षकांनादेखील लक्षात येईल अशाप्रकारे करणारा गीतकार म्हणजे कुमार. इंडस्ट्रीमध्ये पहिलंच गाणं सुपरहिट झालेले खूप कमी गीतकार आहेत, कुमारने लिहिलेलं पहिलंच गाणं इतकं गाजलं कि त्यावर आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी डान्स केला असेल,‘इश्क तेरा तडपावे’ नावाचं हे गाणं अनेकांना ‘ओ हो हो,ओ हो हो’ म्हणून लक्षात असेल.

पंजाबी भाषेचे रिमिक्स करून हिंदी गाणी बनवण्याचा ट्रेंड त्यावेळी नुकताच सुरू झाला होता. तेव्हा कुमारची इंडस्ट्रीत एंट्री झाली, त्यावेळी हिंदी लिहिणार्‍यांची संख्या होती, पण पंजाबी किंवा इंग्रजी शब्द वापरून गाणी गीतकार नव्हते. हे ते युग होतं जेव्हा गाण्यात मुखडा सोडून हुक लाईनचा जमाना सुरू होणार होता. कुमारची इंग्रजी भाषा तितकी चांगली नव्हती, पण मग मुंबईत राहिल्यामुळे त्याला हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत त्याला लिहिता येऊ लागलं. मुसाफिर सिनेमात त्याने देव कोहली सोबत लिहिलेलं ‘जिंदगी में कोई कभी आए ना रब्बा’ हे रिचा शर्माच्या आवाजातलं गाणं तर आजही ब्रेकअप झालेल्या प्रेमवीरांसाठी आधार असतं.

- Advertisement -

मुसाफिरनंतर गोलमाल फन अनलिमिटेडमध्ये त्याने गाणी लिहिली, पण जे यश त्याला हवं होतं ते मिळालं २००७ साली … ओम शांती ओम सारख्या सिनेमात त्याने गाणं लिहिलं, जे राहत फतेह अली खानने गायलं. ओम शांती ओमची इतर सगळी गाणी जावेद अख्तर यांनी लिहिली आहेत, पण त्यातलं एक अत्यंत लोकप्रिय झालेलं गाणं ‘जग जग सुना सुना लागे’ हे कुमारने लिहिलं होतं. मुसाफिरचं रब्बा आणि ओम शांती ओमचं जग सुना लागे सारखी गाणी लिहिल्यानंतर कुमार केवळ ब्रेकअप साँग्स लिहितो की काय असं अनेकांना वाटलं, पण पुढच्याच वर्षी आलेल्या दोस्तानामधून त्याने हा भ्रमदेखील तोडून टाकला. २००८ साली आलेल्या दोस्ताना सिनेमात त्याने देसी गर्ल सारखा डान्स नंबर लिहिला आणि त्यातच माँ दा लाडला बिगड गया सारखं गाणं लिहिलं.

पंजाबी शब्द हुक लाईन म्हणून वापरणं ही कुमारची खासियत आहे, ते शब्द वापरताना हिंदी प्रेक्षकांना ते नवीन वाटले तरी त्यांना किमान कळावे असे ते शब्द असतात. माँ दा लाडला म्हटलं की लगेच कळतं, अगदी तसंच सानू केहदी है , चिट्टीया कलाइयां, ये दुनिया पित्तल दि, तेनुं इतना में प्यार करा, दिल्ली वाली गर्लफ्रेंड अशी विविध गाणी आहेत ज्यात पंजाबी फ्लेवर पहायला मिळतो आणि त्यामुळेच ती गाणी तितकी हिट झाली. कुमारच्या करियरमध्ये ऑल द बेस्ट सिनेमा नंतर राज सारखा सिनेमा आला ज्यात त्याचं सोनीयो नावाचं गाणं चाललं. सिनेमा पडला तरी चालेल, पण गाणी चालली पाहिजेत, याच सूत्राचा विचार केला तर कुमारचा तुम मिले नावाचा सिनेमा आपटला होता, पण त्यातली गाणी भयंकर चालली. दिल इबादत, तू हि हकीकत सारखी गाणी आजही इम्रान हाश्मी आणि केके फॅन्सच्या फेव्हरेट प्लेलिस्टमध्ये असतात.

कुमारच्या पंजाबी आणि इंग्रजी प्रेमाबद्दल आपण वाचलं, पण त्याच एक उदाहरण म्हणजे चान्स पे डान्स सिनेमातलं ‘पे पे पे पें, प्या’ सारखं गाणं… आय हेट लव्ह स्टोरी सिनेमातलं टायटल ट्रॅक आणि बहारा बहारा सारखं गाणं, अनजाना अनजानी मधलं तुझे भुला दिया, गोलमाल ३ मधलं अपना तो हर दिन ऐसे जिओ, मर्डर २ मधील हाल ए दिल, देसी बॉईज सिनेमातलं सुबह होने ना दे, ये जवानी है दिवानी मधलं दिल्लीवाली गर्लफ्रेंड, रागिनी MMS २ मधलं बेबी डॉल,रॉय सिनेमातलं सुरज डुबा है, चिट्टीया कलैया, कपूर & सन्स सिनेमातलं लडकी ब्युटीफुल, हिंदी मिडीयममधलं एक जिंदरी यांसारखी अनेक सुपरहिट गाणी कुमारने लिहिली आहेत. यातलं ओ माय गॉड सिनेमातलं ‘मेरे निशां है कहाँ’ सोनू के टिटू कि स्वीटी मधलं तेरा यार हु मै, शाहरुख खानच्या पठाण मधलं झुमे जो पठाण आणि बेशरम रंग, नुकताच सगळीकडे चर्चेत असणार्‍या जवान सिनेमातलं चलेया आणि फराटा ही गाणीदेखील कुमारने लिहिली आहेत. २००४ पासून २०२३ पर्यंत अनेक सुपरहिट सिनेमांच्या माध्यमातून आपल्या लेखणीतून एकास एक सुपरहिट गाणी लिहिणारा कुमार हा सुपरहिट गाण्यांचा बादशाह बनलाय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -