घरफिचर्सजागतिक स्वयंचलित वाहन दिन

जागतिक स्वयंचलित वाहन दिन

Subscribe

नैऋत्य जर्मनीतील मॅन्हम शहरात राहणारे उद्योजक-अभियंता कार्ल बेंझ यांना त्यांच्या स्वयंचलित मोटारवाहनासाठी १८८६ साली पेटंट देण्यात आले. म्हणजे एकप्रकारे 29 जानेवारी 1886 रोजी गाडीचा जन्म झाला. तोवर जगभरात फक्त घोडागाडी, टांगा किंवा बैलगाड्यांसारखी वाहने पाहायला मिळायची. म्हणून इथे स्वयंचलित हा शब्द महत्वाचा ठरतो. कार्ल बेंझ यांचे स्वयंचलित वाहन अगदी साधेसुधे. ते दिसायला टांग्यासारखेच होते. एक आसनी, लाकडी फ्रेम, लाकडी चाके वगैरे. मात्र, त्याच्या पुढे घोडे नव्हते आणि मागे एक चुक-चुक असे आवाज करणारे, धूर सोडणारे दोन हॉर्सपावरचे इंजिन होते. कार्ल बेंझ यांना वाटायचे की या गाडीवर अद्याप बरेच काम करण्याची गरज आहे, पण त्यांची पत्नी बर्था बेंझ मात्र अस्वस्थ होत होती.

बर्थाला वाटत होते की ही गाडी अगदी सुरक्षित आहे, त्यामुळे तो दोन मुलांना घेऊन पतीच्या नकळत तिच्या माहेरी फॉर्झएमला जायला निघाली. या राऊंड ट्रिपचे एकूण अंतर होते 194 किलोमीटर. ती मोटरवॅगन-3 या गाडीवर बसली. मग सुरू झाला हा खडतर प्रवास. वाटेत अनेक आव्हाने आली, इंजिन बिघडले, एखादा वॉल्व तुटला आणि कधी इंधनच संपले. मात्र, तिने यासाठी जिथे असेल, तसा जुगाड करत आपले मार्गक्रमण सुरूच ठेवले.

- Advertisement -

अखेर बर्था फॉर्झएमला पोहोचली, माहेरी काही काळ विसावली आणि परतीचा प्रवास त्याच वाटेवरून सुरू केला. नवर्‍याच्या नकळत तिने केलेला हा प्रवास आज मानवजातीसाठी अक्षरशः मैलाचा दगड ठरला. कार्ल बेंझ स्वगृही परतले तेव्हा त्यांना यावर आधी विश्वास बसला नाही. मात्र, तोवर त्यांचा हा आविष्कार त्यांच्या गॅरेज आणि पेटंट ऑफीसपलीकडे पोहोचला होता आणि आता त्यांच्या ‘मोटरवॅगन’ची चर्चा पंचक्रोशीत होत होती. खरेतर बर्था यांच्याच त्या धाडसी निर्णयामुळे आज जर्मनीचे नाव जागतिक वाहन उद्योगात अग्रस्थानी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -