मेष :- ठरविलेली योजना पूर्ण करण्यात अडथळे येऊ शकतात. सर्वांची मदत घेता येईल. मोठेपणा करू नका.
वृषभ :- तुमच्या कामाला दिशा मिळेल. धंद्यात जम बसेल. नवीन ओळख झाल्याने कामातील उत्साह वाढेल.
मिथुन :- कोर्ट केस संपवता येईल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. आपुलकी देणारी माणसे भेटतील.
कर्क :- गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. प्रकृतीत सुधारणा होईल. नोकरांचा प्रश्न सुटेल.
सिंह :- वडीलधार्या माणसांचा मान ठेवा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. धंद्यात फायदा होईल.
कन्या :- मनावरील ताण कमी होऊ शकेल. मतभेद मिटवता येईल. प्रकृतीत सुधारणा होईल.
तूळ :- कोणतेही काम करताना सावधगिरी बाळगा. दुखापत संभवते. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक :- ठरविलेले काम वेळेत पूर्ण करू शकाल. मित्र मदत करेल. धंद्यात फायदा घेता येईल.
धनु :- क्षुल्लक अडचणीवर मात करता येईल. नको असलेल्या व्यक्तीसाठी वेळ खर्च होईल. आवडते पदार्थ मिळतील.
मकर :- तुम्ही ठरविलेले काम पूर्ण होईल. थोरा-मोठ्यांचा परिचय होईल. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील.
कुंभ :- व्यवसायाचा करार करता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रेमाला चालना मिळेल.
मीन :- मनाची द्विधा अवस्था होईल. प्रेम करणार्या व्यक्तीला नाराज करू नका. खोटे प्रेम ओळखा.