घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : शुक्रवार २६ जानेवारी २०२४

राशीभविष्य : शुक्रवार २६ जानेवारी २०२४

Subscribe

मेष – आजचा निर्णय आजच घ्या. भेट घ्या. चर्चा करा. लोकांना तुमचा मुद्दा पटवून द्या. नवे काम मिळवा.
वृषभ – कायद्याच्या संबंधी काम करून घेता येईल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. धंदा वाढेल.
मिथुन – तुम्हाला विरोध करणारा माणूस मैत्री करण्यास येईल. नोकरीत वरिष्ठांना खूश करा. प्रेमात वाद संभवतो.
कर्क – अधिकार भांडून मिळणे कठीण आहे. अरेरावी करू नका. गुप्त कारवायांचा बिमोड प्रेमानेच करा.
सिंह – तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रेमाची माणसे तुमचे मन सांभाळतील. धंद्यात सुधारणा होईल. यश मिळवाल.
कन्या – आज तुमच्या मनात गोंधळ तयार होईल. शांतपणे विचार करा. रात्री उशिरा चांगला मार्ग तुम्हाला मिळेल.
तूळ – आजच तुमचा उत्साह राहील. कामे करून घ्या. संततीची प्रगती होईल. मान-प्रतिष्ठा मिळेल.
वृश्चिक – तुमचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत राहा. लोकांची, सरकारी वर्गांची मदत मिळेल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.
धनु – तुमच्या कार्याला वेग येईल. कुणावर विश्वास टाकायचा याचा नीट विचार करा. खरेदी कराल.
मकर – प्रकृतीची काळजी घ्या. वादविवाद जास्त करू नका. आज कदाचित तडजोड करावी लागेल.
कुंभ – महत्त्वाचा निर्णय घेता येईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. प्रतिष्ठा मिळेल. वास्तू खरेदीचा विचार होईल.
मीन – वाद व तणाव होईल. रस्त्याने चालताना काळजी घ्या. दुखापत होऊ शकते. धंद्यात दुर्लक्ष करू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -