Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : शुक्रवार, ०२ एप्रिल २०२१

राशीभविष्य : शुक्रवार, ०२ एप्रिल २०२१

Related Story

- Advertisement -

मेष ः- धंद्यात अनाठाई होणारा खर्च लक्षात येईल. तुमचा मुद्दा घरातील लोकांना पटवून देता येईल.

वृषभ ः- गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. मौज मजा कराल. कोर्ट केसमध्ये मदत मिळेल.

- Advertisement -

मिथुन ः- बुद्धिचातुर्याचे कौतुक होईल. संगीत क्षेत्रात मन रमेल. आवडत्या विषयात मन एकाग्र होईल.

कर्क ः- मनावर दडपण राहील. प्रवासात ओळख होईल. महत्त्वाची वस्तू वेळेवर जागेवर ठेवा.

- Advertisement -

सिंह ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. दूरच्या प्रवासात जाण्याचे ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल.

कन्या ः- तुमच्या मेहनतीला यश मिळेल. घरातील कामे करून घेता येतील. शेजारी मैत्री करेल.

तूळ ः- तुमचा उत्साह वाढेल. कल्पनाशक्ती कृतीत उतरवता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

वृश्चिक ः- जिद्दीने तुमच्या कामात यश खेचावे लागेल. घरातील कामे करण्यास टाळाटाळ करू नका.

धनु ः- महत्त्वाची भेट घ्या. चर्चा करता येईल. प्रतिष्ठा मिळेल. नवीन ओळखीमुळे उत्साह वाढेल.

मकर ः- प्रवासात महत्त्वाची वस्तू सांभाळा. प्रेमाला चालना देणारी घटना घडेल. फसगत टाळता येईल.

कुंभ ः- आज ठरविलेले काम उद्यावर टाकू नका. मोकळ्या हवेत फिरण्याचा मूड होईल. आनंदी रहाल.

मीन ः- तुमच्यावर टाकलेली कामाची जबाबदारी वेळेत पूर्ण करता येईल. जुन्या आठवणीत मन रमेल.

- Advertisement -