घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : सोमवार २९ जानेवारी २०२४

राशीभविष्य : सोमवार २९ जानेवारी २०२४

Subscribe

मेष :- तुमचा तोल ढळण्याची शक्यता आहे. कुणालाही अपशब्द बोलू नका. संयम बाळगा. तुमची प्रतिष्ठा टिकून राहील.
वृषभ :- कठीण काम करून घ्या. कायद्याच्या कामात यश मिळेल. नवीन मित्र-मंडळी तयार होतील. कलेत प्रगती होईल.
मिथुन :- घरात खंबीरपणे तुमचे मत मांडाल. घरातील समस्या सोडवता येईल. जवळच्या व्यक्तीवर अविश्वास दाखवू नका.
कर्क :- धंद्यात वाढ होईल. तडजोड करून इतरांना मदत करा. मित्रांचे सहकार्य मिळेल. अहंकार मुळीच बाळगू नका.
सिंह :- नवीन घर, जमीन घेण्याचे ठरवाल. प्रयत्नांना यश मिळेल. जुने मित्र, आप्तेष्ट भेटतील. धंद्यात नवे काम मिळेल.
कन्या :- मन स्थिर ठेवा. मान-प्रतिष्ठा मिळेल. कार्ट केस मिटवता येईल. नोकरीत प्रगती होईल. प्रमोशन मिळेल.
तूळ :- कामाचा व्याप वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नका. मनाला त्रास होण्याची शक्यता.
वृश्चिक :- तुम्हाला हवा असलेला निर्णय आज घेता येईल. मैत्री वाढेल. स्पर्धेत यश मिळेल. कलेत प्रगती होईल.
धनु :- मातब्बर लोकांचा परिचय होईल. स्पर्धा जिंकाल. मैत्रीतील दुरावा कमी करता येईल. नवे मित्र जोडता येतील.
मकर :- कामातील तणाव कमी करता येईल. नवीन ओळखीचा उपयोग तुम्हाला होईल. धंद्यात समजूतदारपणा दाखवा.
कुंभ :- प्रकृतीची काळजी घ्या. सामाजिक कामासाठी घरातील लोकांचा विरोध होईल. मनावर दडपण येईल. शांत राहा.
मीन :- आजचे काम चांगल्याप्रकारे होईल. मोठ्या लोकांचा सहवास मिळेल. नोकरीत अधिकार मिळू शकेल. यश मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -