Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : सोमवार १४ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : सोमवार १४ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : महत्त्वाची कामे सकाळी करून घ्या. धंद्यात यश मिळेल. तब्येत उत्तम राहील. वाहन हळू चालवा.

वृषभ : घरातील कामे आजच करून घ्या. धंद्यात लक्ष द्या. मोठे काम मिळवता येईल. नोकरीचा प्रयत्न करा.

- Advertisement -

मिथुन : धंद्यात चर्चा करताना विचारपूर्वक शब्द वापरा. नोकरीतील तणाव कमी करता येईल. मित्र भेटतील.

कर्क : सकाळी वाद होऊ शकतो. लंचनंतर तुम्हाला समस्या सोडवता येईल. वरिष्ठांची मदत मिळेल. स्पर्धा जिंकाल.

- Advertisement -

सिंह : दुपारनंतर काम करताना संयम ठेवा. अडचणी येतील. घरातील व्यक्तीचे सहकार्य मिळेल. धंद्यात काम मिळेल.

कन्या : सकाळी होणारा वाद दुपारनंतर मिटवता येईल. योग्य उपाय तुम्हाला शोधता येईल. घर खरेदीचा विचार कराल.

तूळ : दुपारनंतर विलंबाने कामे होतील. मन अस्थिर होईल. प्रवासात घाई करू नका. जुने स्नेही भेटतील.

वृश्चिक : तुमच्या कार्याला गती देता येईल. धंद्यात वाढ करू शकाल. ओळखीतून मोठे काम मिळेल. स्पर्धा जिंकाल.

धनु : नोकरीत वरिष्ठांचा शब्द ग्राह्य मानावा लागेल. वाटाघाटीची चर्चा करताना सर्वांचे मत ऐकावे लागेल.

मकर : राजकीय-सामाजिक कार्यात प्रगतीची नवी संधी मिळेल. घरगुती प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. रेंगाळत ठेवू नका.

कुंभ : धंद्यात चांगला जम बसेल. नवे काम मिळेल. साहित्याला नवा विषय मिळेल. ओळखी वाढतील. कलेत चमकाल.

मीन : सकाळी क्षुल्लक कारणाने काम रेंगाळण्याची शक्यता आहे. दुपारनंतर तुमच्या कामात वेगाने प्रगती होईल.

- Advertisment -