घरमहाराष्ट्रRain Update : पावसाचे लवकरच होणार आगमन; हवामान विभागाने दिली तारीख

Rain Update : पावसाचे लवकरच होणार आगमन; हवामान विभागाने दिली तारीख

Subscribe

Rain Update : देशभरात यंदा उशिरा दाखल झालेल्या पावसाने जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा एकदा दडी मारली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून पावसाचे पुनरागमन (Rain Update) कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आता हवामान विभागाने (IMD) मोठी अपडेट दिली आहे. भारतीय हवामान विभाग विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी पाऊस कधी परतणार याबाबत माहिती दिली आहे. (Rain Update Rain coming soon Date given by Meteorological Department)

हेही वाचा – Sharad Pawar : अजित पवारांना…; शरद पवार यांनी सांगितलं भेटीमागचं कारण

- Advertisement -

के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या ट्विटरनुसार, महाराष्ट्रात येत्या 18 ऑगस्टपासून पाऊस परतण्याची शक्यता आहे. राज्यात 18 ते 31 ऑगस्ट या दरम्यान पावसाची शक्यता आहे. विशेष म्हणजे विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे. याशिवाय ऑगस्टच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पाऊस परतण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

- Advertisement -

विदर्भात मान्सूनच्या पावसाची शक्यता

यंदा बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. केरळमध्ये 1 जूनला दाखल होणारा पाऊस यंदा 8 जूनला दाखल झाला. त्यानंतर महाराष्ट्राच्या रत्नागिरीत 11 जूनला मान्सूनचे आगमन झाले. पण त्यानंतरही पावसाची हवी तशी प्रगती पाहायला मिळाली नाही. चंद्रपूरमधून विदर्भात मान्सून सक्रीय झाला. मात्र आता 15 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भात मान्सूनचा पाऊस सुरु होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

हेही वाचा – Prakash Ambedkar : संघाचा काळा इतिहास…; आंबेडकरांची RSSवर सडकून टीका

परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांसाठी मान्सूनचा पाऊस महत्त्वाचा असतो. कारण त्यांच्याकडे जलसिंचनाची साधनं नसल्यानं जर पावसानेही दडी मारली तर त्यांना खरीप हंगामात पिकांना पाणी देणं अवघड होऊन बसतं. राज्यातील काही शेतकरी पिकांसाठी पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना पावसानं दडी मारल्यानंतर नुकसान सहन करावं लागतं. त्यामुळे राज्यात मान्सूनने दडी मारल्यास परतीच्या पावसाकडे शेतकऱ्याचे लक्ष लागून राहते. त्यामुळे येत्या काही दिवसात मान्सूनचे पुन्हा आगमन झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -