घरसंपादकीयदिन विशेषसामाजिक कार्यकर्त्या गोदावरी परुळेकर

सामाजिक कार्यकर्त्या गोदावरी परुळेकर

Subscribe

गोदावरी शामराव परुळेकर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1908 रोजी झाला. या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या व लेखिका होत्या. त्यांचे वडील ख्यातनाम वकील होते. त्यांनी आपल्या या लेकीला वैचारिक स्वातंत्र्य दिले, तसेच कृती करण्यासाठी पाठबळही पुरवले. बी.ए. एलएल.बी. झालेल्या गोदावरीबाई कामगार चळवळीत सामील झाल्या. याच काळात साम्यवादी कार्यकर्ते शामराव परुळेकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर त्यांना कामगारांच्या विविध प्रश्नांची माहिती झाली. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात त्यांना वरचेवर तुरुंगवासात दिवस काढावे लागले. युद्ध संपल्यानंतर त्या वारली शेतकर्‍यांशी जोडल्या गेल्या. त्या शेतकर्‍यांची वेठबिगारीत दखल घेतली जात नव्हती आणि समाजात त्यांना प्रतिष्ठाही नव्हती. त्यांची सामाजिक उन्नती व्हावी यासाठी वारली शेतकर्‍यांच्या संघर्षाचा त्या एक भाग बनल्या.
1912 मध्ये ना. म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद साहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात मोलाची भूमिका पार पाडली. गिरगावपासून परळपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. 1917 मध्ये चिंचपोकळी येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी त्यांची 11 मोफत ग्रंथालये व 10 मोफत वाचनालये मोफत चालू होती. 1945च्या सुमारास परुळेकर दाम्पत्य ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वस्तीच्या डहाणू, तलासरी गावात फिरत असताना तेथील आदिवासींचे गुलामगिरीचे भीषण जीवन पाहून तेथेच काम करायचे त्यांनी ठरवले. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या शोषणाविरुद्ध सावकार, जमीनदारांविरुद्ध संघर्ष उभारताना आलेले अनुभव या लढ्याची कहाणी, ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकात गोदावरीबाईंनी चित्रबद्ध केली. अशा या थोर समाजसेविकेचे 8 ऑक्टोबर 1996 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -