Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : गुरुवार १७ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : गुरुवार १७ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष – घरातील व्यक्तीची मदत घेता येईल. धंद्यात वाढ होईल. प्रवासाचा बेत ठरवाल. स्पर्धेत नवीन ओळख होईल.

- Advertisement -

वृषभ – विचारांना दिशा मिळेल. प्रवासात घाई करू नका. धंद्यात लक्ष द्या. तब्येत उत्तम राहील.

मिथुन – मैत्रीत घनिष्ठ संबंध तयार होईल. धंदा मिळेल. नोकरीत कौतुक होईल. वरिष्ठांची मर्जी राखाल.

- Advertisement -

कर्क – क्षुल्लक कारणाने राग धरू नका. आक्रमता दाखवू नका. मैत्री सांभाळावी लागेल. वरिष्ठ भेटतील.

सिंह – रेंगाळलेली कामे पूर्ण कराल. नोकरीत काम वाढेल. जुना वाद संपवता येईल. खरेदी कराल.

कन्या – धंद्यात जम बसेल. नवीन ओळखीचा उपयोग करून घेता येईल. मौल्यवान खरेदी कराल.

तूळ – मनाची द्विधा अवस्था होईल. आप्तेष्ठांना भेटाल. राजकीय सामाजिक कार्यात यश मिळेल. कर्ज मिळेल.

वृश्चिक – कामाची योग्य वेळ ठरवा. रागावर ताबा ठेवा. किरकोळ अडचण येईल. आळस कराल. धंदा सांभाळा.

धनु – आजच ठरविलेले काम करा. वाहन, घर, जमीन खरेदीचा विचार कराल. प्रेमाला चालना मिळेल.

मकर – तुमच्या अंदाजानुसार धंद्यात फायदा होईल. मान-प्रतिष्ठा मिळेल. योग्य व्यक्ती समवेत ठेवा.

कुंभ – प्रेमाला साथ मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. जुने स्नेही भेटतील. कठीण काम करून घ्या.

मीन- नोकरीत दगदग होईल. कामाचा ताण घेऊ नका. तब्येत सांभाळा. धंद्यात वाढ होईल. रागावर ताबा ठेवा.

- Advertisment -