घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : गुरुवार १८ जानेवारी २०२४

राशीभविष्य : गुरुवार १८ जानेवारी २०२४

Subscribe

मेष : तुम्ही सर्वांशी जिव्हाळ्याने वागा. प्रेमाने प्रश्न सोडवा. कामात नवीन जबाबदारी स्वीकाराल.

वृषभ : महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. घरातील वाद चव्हाट्यावर येऊ शकतो. डोळ्यांची काळजी घ्या.

- Advertisement -

मिथुन : आजचे काम उद्यावर टाकू नका. मेहनतीचे फळ चांगलेच मिळेल. वरिष्ठांना दुखवू नका.

कर्क : रागावर नियंत्रण ठेवल्यास सर्व कामे नीट पूर्ण करू शकाल. धंद्यात गोड बोला. ग्राहकांना सांभाळता येईल.

- Advertisement -

सिंह : मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न कराल. नोकरीतील तणाव कमी होईल. घरात आनंदीपणा राहील.

कन्या : धावपळ, दगदग नातलगांच्यासाठी करावी लागेल. अधिकार प्राप्तीसाठी आश्वासन मिळेल.

तूळ : घरातील कामे होतील. भेटीत यश मिळेल. घर खरेदी-विक्रीत फायदा होईल. धंद्यात नवे काम मिळेल.

वृश्चिक : प्रवासात घाई करू नका. सौम्य धोरण ठेवा. मोठ्या लोकांची मदत घेता येईल. कोर्टकेस यशस्वी होईल.

धनु : घरातील वडीलधार्‍या व्यक्तींकडे लक्ष द्या. कामात वरिष्ठांचा राग समजून त्याप्रमाणे वागता येईल. धंद्यात तेजी येईल.

मकर : आपलेपणाची भावना निर्माण झालेल्या माणसांची मैत्री दृढ होईल. धंद्यात नवा पर्याय शोधता येईल.

कुंभ : जुने मित्र भेटतील. थकबाकी वसूल होईल. धंद्यात चांगला जम बसेल. खरेदी कराल. आरोग्य उत्तम राहील.

मीन : कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. प्रतिष्ठा वाढेल. उद्योगात नवा मार्ग मिळेल. पैसा साठवून ठेवा. घर खरेदी करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -