राशीभविष्य: गुरुवार २६ जानेवारी २०२३

Daily Horoscope, Know your Horoscope
राशीभविष्य

मेष ः- तुमच्या कामातील अडचणी दूर करता येतील. गैरसमज दूर करून टाका. घरात प्रेमाने वागा.

वृषभ ः- कोर्टाच्या कामात नम्रपणे बोला. मित्र मदत करतील. नोकरांना व्यवसायात कमी समजू नका.

मिथुन ः- ताण-तणाव वाढू शकतो. घाईघाईत काम करण्यामुळे दुखापत होऊ शकते. कायदा मोडू नका.

कर्क ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. महत्त्वाचा निर्णय घेता येईल. आप्तेष्ठांच्या भेटी होतील.

सिंह ः- विरोधकांचा डाव ओळखा, त्यामुळे योग्य काम करता येईल. प्रतिष्ठा सांभाळता येईल. खाण्याची काळजी घ्या.

कन्या ः- आज केलेल्या कामात यश मिळेल. प्रेमाचे समस्या सोडवा. धंद्यात गोड बोलावे लागेल. स्पर्धा जिंकाल.

तूळ ः- क्षुल्लक अडचण काम करताना येईल. दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. प्रवासात घाई करू नका.

वृश्चिक ः- विरोध दूर करून तुमचे काम जिद्दीने पूर्ण करता येईल. वरिष्ठांबरोबर नम्रपणे वागा.

धनु ः- संततीच्या प्रगतीच्या दृष्टीने विचार कराल. मुलांला चांगली नोकरी लागेल. धंद्यात वाढ होईल.

मकर ः- नवीन मित्र मिळतील. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. घरातील कामे होतील.

कुंभ ः- कामाचा व्याप वाढेल. भावनेच्या भरात कोणतीही गोष्ट करू नका. प्रवासात घाई करू नका.

मीन ः- आजचे काम उद्यावर टाकू नका. धंद्यात फायदा होईल. नावलौकिक मिळेल. अडचणी संपवता येतील.