घरताज्या घडामोडीसत्ता गेली म्हणून.., दावोस दौऱ्यावरील आरोपाला केसरकरांचं प्रत्युत्तर

सत्ता गेली म्हणून.., दावोस दौऱ्यावरील आरोपाला केसरकरांचं प्रत्युत्तर

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्याच्या खर्चावरून आदित्य ठाकरे यांनी काल राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शिंदे दाओसला चार्टड फ्लाईटने परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले.

युवकांकडे परिपक्वता असली पाहिजे. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री चार्टड फ्लाइटने गेले होते. राज्यात पंतप्रधानांचा दौरा होता. त्यामुळे मुख्यमंत्री चार्टड फ्लाईटने मुंबईत आले. प्रत्येक दौऱ्याची आणि खर्चाची सरकार दरबारी नोंद असते. सरकारच्या खर्चावर बारीक नजर असते. त्यामुळे ज्यांना अनुभव नाही, परिपक्वता नाही, ते लोक वारंवार असे बोलत असतात. बोलताना थोडा संयम राखला पाहिजे. सत्ता गेली म्हणून अस्वस्थ होऊ नका. डोक्यात एवढा राग घेऊ नका. थोडे शांत व्हा, असा सल्ला दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केले, त्या कंपन्या महाराष्ट्रातीलच आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. तो दावा केसरकर यांनी अमान्य केला. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा दावोसला जाऊन करार केले, तेव्हा त्यावेळी महिंद्रा कंपनी होती.एखादी कंपनी राज्यातील असली तरी त्यात परदेशी गुंतवणूक असते. परदेशी गुंतवणूकदारांना भारताशी करार करायचा असतो. तो दावोसला होतो. एवढा साधा कॉमनसेन्स नसेल तर त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. त्यांच्यावर टीका करणार नाही. त्यांच्याबद्दल आदर आहे. पण माहिती घेण्यासाठी त्यांनी किमान प्रवक्ता नेमावा, असं केसरकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याबद्दल लोक विचारणारच ना? त्यात एवढे मोठे काय? तुमच्या राज्यात सत्ता कुणाची आहे, असे बाहेरच्या पंतप्रधानांना जाणून घ्यायचे असते, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.

- Advertisement -

हेही वाचा : सीबीआयला पैसे परत द्यायला सांगा; राकेश रोशन यांची हायकोर्टात याचिका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -