Eco friendly bappa Competition
घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : मंगळवार १५ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : मंगळवार १५ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : चोहोबाजूने विरोध होण्याची शक्यता आहे. जवळचे लोक तुमची सहाय्यता करतील. प्रेमाने प्रश्न सोडवा. अरेरावी करू नको.

- Advertisement -

वृषभ : महत्त्वाची कामे करा. कोर्ट केसमध्ये योग्य दिशा मिळेल. जवळच्या लोकांची गरज भागवावी लागेल. मोठे काम मिळेल.

मिथुन : धंद्यात वाढ करण्याचा विचार कराल. घर, जमीन खरेदीची चर्चा कराल. कला-क्रीडा क्षेत्रात मन रमेल.

- Advertisement -

कर्क : मुलांच्या प्रगतीने तुमचा उत्साह वाढेल. शुभ समाचार मिळेल. थकबाकी वसूल करण्याचा प्रयत्न करा.

सिंह : प्रवासात अडचण येऊ शकते. धंद्यात वाद होईल. नोकरीत वरिष्ठांच्या बरोबर मतभेद होईल. वाहन हळू चालवा.

कन्या : आत्मविश्वासाने तुम्ही तुमचे काम कराल. नवीन ओळख होईल. कला-क्रीडा स्पर्धेत नंबर काढाल. यशस्वी दिवस.

तूळ : सहनशीलता ठेवा. कामे होतील. दुखापत होऊ नये म्हणून काळजीपूर्वक काम करा. तणाव वाढू शकतो.

वृश्चिक : महत्त्वाचे काम करून घेता येईल. प्रतिष्ठित व्यक्तीचा परिचय होईल. स्पर्धेत नावलौकिक मिळेल. धंदा वाढेल.

धनु : नोकरीत कामाचा व्याप वाढेल. प्रेमाला चालना देणारी घटना घडेल. कला-क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल.

मकर : घरगुती प्रश्न वाढवू नका. केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. खाण्याची काळजी घ्या. अनोळखी माणसाला दूर ठेवा.

कुंभ : व्यवसायाला कलाटणी मिळेल. कला क्षेत्रात चमकाल. विवाहासाठी प्रयत्न करा. नोकरी मिळेल. येणे वसूल करा.

मीन : मनाची द्विधा अवस्था होईल. कला क्षेत्रात विशेष ओळखी होतील. रेंगाळलेले काम करून घ्या. धंदा वाढेल.

- Advertisment -