घरभविष्यआजचे राशीभविष्यराशीभविष्य : बुधवार ३१ जानेवारी २०२४

राशीभविष्य : बुधवार ३१ जानेवारी २०२४

Subscribe

मेष – विरुद्धलिंगी व्यक्ती तुमची योग्य मदत करेल. मैत्री वाढेल. स्पर्धेत जिंकाल. धंदा वाढ होईल.

वृषभ – तुम्हाला पटवून देताना जास्त मेहनत घ्यावी लागेल. डोळ्यांची काळजी घ्या. वस्तू नीट ठेवा.

- Advertisement -

मिथुन – मुलांच्या संबंधी चांगली बातमी मिळेल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. वाहन जपून चालवा.

कर्क – विरोधकांना कसे जिंकायचे याचा विचार करा. तुम्ही ठरवा. योग्य मोठ्या माणसाचा सल्ला घ्या.

- Advertisement -

सिंह – तुमचा आत्मविश्वास वाढेल. उत्साहाच्या भरात कठीण काम करून घेता येईल. मैत्री कराल.

कन्या – धंद्यात वाढ होईल. वाटाघाटीत यश मिळेल. प्रतिष्ठा मिळेल. जुना वाद मिटवता येईल.

तूळ – मनाची द्विधा अवस्था होईल. भावनांना आवर घाला. मौल्यवान वस्तू नीट ठेवा.

वृश्चिक – तुमची कामे वेळच्यावेळी करा. वाहन नीट चालवा. रागाचा पारा वाढेल. संयम बाळगा.

धनु – प्रकृतीत सुधारणा होईल. गैरसमज दूर करू शकाल. मान-प्रतिष्ठा मिळेल. भिडस्तपणा ठेवू नका.

मकर – विचारांना चालना मिळेल. लोकांचा अनुभव घ्याल. तुमच्या मुद्यावर तुम्ही ठाम राहू शकाल.

कुंभ – तुमच्याबद्दलचा गैरसमज इतर लोक दूर करतील. दिलगिरी व्यक्त करतील. तुमचा प्रश्न सुटेल.

मीन – कामात चूक होण्याची शक्यता आहे. सावध रहा. प्रवासात वेळ जाईल. कायद्याचे पालन करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -