घर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य : बुधवार १६ ऑगस्ट २०२३

राशीभविष्य : बुधवार १६ ऑगस्ट २०२३

Subscribe

मेष : विरोध सहन करा. जास्त वाद वाढवू नका. उद्या तुमचे मत सर्वांना पटवून देता येईल. प्रकृतीची काळजी घ्या.

- Advertisement -

वृषभ : नोकरीचा प्रयत्न करा. घरगुती प्रश्नावर उत्तरे शोधावी लागतील. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. स्पर्धेत पुढे जाल.

मिथुन : धंद्यात सुधारणा होईल. चर्चा करताना सौम्य धोरण ठेवा. घरगुती कामे होतील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.

- Advertisement -

कर्क : मुलांची प्रगती होईल. जीवनसाथीची मर्जी राखावी लागेल. अधिकार प्राप्ती होण्याची आशा निर्माण होईल.

सिंह : प्रतिष्ठेवर टीका होईल. तुमचे बोलणे स्पष्ट वाटेल. वाटाघाटीची चर्चा फिसकटण्याची शक्यता आहे.

कन्या : घरात चांगली बातमी कळेल. नोकरीत बदल करता येईल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल. ओळख होईल.

तूळ : कामाचा व्याप सहन करावा लागेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. क्षुल्लक कारणाने वाद होऊ शकतो. नम्र रहा.

वृश्चिक : तुमच्या कार्याला दिशा मिळेल. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. चिडचिड मात्र करू नका.

धनु : नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. घरातील वृद्ध व्यक्तीचा प्रश्न कसा सोडवायचा हा विचार कराल. चर्चा नीट करा.

मकर : राहून गेलेले कोणतेही काम करून घ्या. जीवनसाथी, मुले यांच्या आनंदासाठी चांगला बेत ठरवा. धंदा वाढवा.

कुंभ : किरकोळ कारणाने मन खिन्न होईल. ठरविलेली वेळ सांभाळावी लागेल. प्रवासात अडथळा येईल. आळस येईल.

मीन : नवीन ओळखीचा उपयोग धंदा मोठा करण्यासाठी करून घेता येईल. कला-क्रीडा स्पर्धेत चमकाल.

- Advertisment -