घरभविष्यसाप्ताहिक राशीभविष्यराशीभविष्य: रविवार २१ जानेवारी ते शनिवार २७ जानेवारी २०२४

राशीभविष्य: रविवार २१ जानेवारी ते शनिवार २७ जानेवारी २०२४

Subscribe

मेष ः- या सप्ताहात मेषेत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात काम मिळाले तरी उधारीवर माल देऊ नका. गोड बोलून लोक मागून घेतील. हिशोब नीट करा. घरातील व्यक्तीच्या विषयी चिंता वाटेल. सप्ताहाच्या मध्यावर क्षुल्लक तणाव होईल. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. जवळचे लोक तुमचा हेवा करतील. तुम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करतील. कला-क्रीडा क्षेत्रात सर्वांच्या मतानुसार वागावे लागेल. तुमची कल्पना कृतीत आणण्यास श्रम घ्यावे लागतील. नोकरीत वरिष्ठ मोठे काम तुमच्याकडे देतील. प्रसिद्धीच्या झोतात याल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. सरकारी वर्गाशी भांडण करू नका. विद्यार्थ्यांनी खाण्याची काळजी घ्यावी. परीक्षेत यश मिळेल. शुभ दि. २१, २५

वृषभ ः- या सप्ताहात मेषेत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. कायद्याचे पालन करा. वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार निर्णय ठरवा. धंद्यात काम मिळेल. कामगारांच्या बरोबर भांडण करू नका. सप्ताहाच्या शेवटी राजकीय-सामाजिक कार्यात तत्परता दाखवा. प्रवासात घाई करू नका. राग वाढवणारी घटना घडू शकते. घरातील माणसे तुमच्या पाठीशी असतील. कोर्ट केस कठीण असेल. अरेरावी करून प्रश्न सुटणार नाही. कला-क्रीडा क्षेत्रात लोकांचे प्रेम मिळेल. कमी बोलण्यामुळे तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. संशोधनात दिशाभूल होईल. विद्यार्थ्यांनी घरातील लोकांना फसवू नये. मोठ्यांचे ऐकावे शुभ दि. २२, २६

- Advertisement -

मिथुन ः- या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. हे दोन्ही ग्रह या राशीत उंचीचे फल देतात. व्यवसायात चांगली बातमी मिळेल. जम बसवता येईल. थकबाकी मिळवा. घरातील प्रश्न सोडवता येईल. मुलांची प्रगती आनंद देईल. राजकीय-सामाजिक कार्यात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. तुमचा वाढलेला अधिकार उपयोगात आणा. लोकांना सहाय्य करा. तरच पुढे टिकून राहता येईल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमचे स्वप्न पूर्ण होईल. प्रसिद्धी मिळेल. शेअर्समध्ये फायदा होईल. नोकरी नसलेल्यांना नोकरी मिळेल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. परदेशात जाण्याची संधी मिळेल. घर, जमीन, खरेदी-विक्रीत फायदा होईल. विद्यार्थ्यांनी वेळ फुकट घालवू नये. शुभ दि. २३, २७

कर्क ः- या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. या सप्ताहात धंद्यात लक्ष द्या. टिकवून ठेवण्यासाठी मेहनत घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात तुमच्या मागे लावालावीचे कारस्थान करण्याचा प्रयत्न केला जाईल. गुप्त कारवायांना रोखून ठेवा. दादागिरी न करता समजुतीने प्रश्न सोडवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवीन ओळखी होतील. संसारात जबाबदारी वाढेल. मोठी खरेदी कराल. कोर्ट केसमध्ये जिद्दीने यश मिळवता येऊ शकते. नोकरीत दुसर्‍यांचे काम करून देताना स्वतःचा बचाव करा. संशोधनाच्या कामात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने नियमितपणाने अभ्यास करावा. दुसर्‍यांना कमी लेखू नये. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल.
शुभ दि. २१, २४

- Advertisement -

सिंह ः या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश होत आहे. मनाविरुद्ध एखादी घटना घडली तरी त्यानंतर तुमच्या कामात यश मिळवता येईल. धंद्यात मेहनत घ्यावी लागेल. कामगारांच्या मनातील अडचणी समजून घ्या, तरच काम पूर्ण होईल. राजकीय-सामाजिक कार्यात मोठे लोक तुमचे कौतुक करतील. तडजोड करावी लागेल. मुले, जीवनसाथी यांची समस्या ऐकावी लागेल. कला-क्रीडा क्षेत्रात क्षुल्लक वाद संभवतो. तुमचे खोचक बोलणे आवडणार नाही. कोर्ट केस संपवता येईल. संशोधनात यशस्वी व्हाल. नोकरीत वरिष्ठ खूश होतील. प्रमोशन मिळेल. विद्यार्थी वर्गाने जिद्द न सोडता अभ्यास करावा. यश मिळेल. शुभ दि. २२, २५

कन्या ः- या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमच्यावर आरोप टाकण्याचा प्रयत्न होईल. तुम्ही सहनशीलता ठेवा. नम्रपणे बोला म्हणजे नावलौकिक बिघडणार नाही. धंद्यात सुधारणा करू शकाल. वाद मिटवता येईल. तुमचा प्रेमळ स्वभाव उपयुक्त पडेल. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. मुले, जीवनसाथी यांचा आधार वाटेल. कला-क्रीडा क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवे मित्र मिळतील. कोर्टाच्या कामात सावध रहा. संशोधनाच्या ठिकाणी चौकस बुद्धी वापरा. नोकरीत वरिष्ठांचा मान ठेवा. विद्यार्थ्यांनी चांगली संगत ठेवावी. मोठे व्हावे. शुभ दि. २३, २६

तूळ ः- या सप्ताहात मेषेत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात चांगला फायदा होईल. मोठे काम मिळेल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्याने थोडीच गुंतवणूक करा. नोकरी लागेल. चांगला बदल करू शकाल. घरातील व्यक्तींचा विचार पटवून घ्यावा लागेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. व्यवहार पहा. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. वरिष्ठ पद देतील. जवळच्या माणसांना खूश ठेवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवे मित्र मिळतील. कोर्ट केसमध्ये योग्य मुद्देच बोला. यश मिळेल. संशोधनाच्या कामात धावपळ वाढेल. मित्र दिशाभूल करतील. खाण्या-पिण्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. वाहन जपून चालवा. शुभ दि. २४, २७

वृश्चिक ः या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय-सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेता येईल. विरोधक आरोप करतील. तुम्हाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल. धंद्यात वाढ करता येईल. संधी सोडू नका. मोठे लोक कदाचित तुमची परीक्षा घेतील. संसारातील नाराजी दूर होईल. मौज-मजेचा बेत ठरवाल. कला-क्रीडा क्षेत्रात उत्साहवर्धक घडेल. प्रेमाला चालना मिळेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. बदलीची शक्यता आहे. संशोधनाच्या कामात यश खेचून आणता येईल. मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. विद्यार्थ्यांनी गुरुजनांना कमी लेखू नये. शुभ दि. २१, २३

धनु ः या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. तुमचा उत्साह वाढेल. अशी घटना राजकीय-सामाजिक कार्यात घडेल. प्रतिष्ठा मिळेल. घरातील कामे होतील. वाटाघाटीसंबंधी चर्चा सफल होईल. नातलग मदत करतील. तिढा लवकर सोडवा. थकबाकी मिळवा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. नवे काम मिळेल. नवा परिचय होईल. कोर्ट केस जिंकण्याची आशा वाढेल. शेअर्समध्ये योग्य सल्ल्यानेच पैसे गुंतवा. संशोधनात यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने चांगली संगत ठेवल्यास चुका होणार नाहीत. यश सोपे होईल. अभ्यासाकडे लक्ष द्यावे. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. वाहन हळू चालवा. वाहतुकीचे नियम पाळा. शुभ दि. २२, २४

मकर ः या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. धंद्यात मोठे कंत्राट मिळू शकेल. विचारपूर्वक करार करा. घरातील कामे होतील. सप्ताहाच्या सुरुवातीला वाद होईल. रागावर ताबा ठेवा. संयम बाळगा. वाद घालू नका. राजकीय-सामाजिक कार्यात स्वतःचा विचार पक्का ठेवा. ऐकावे जनाचे करावे मनाचे. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमच्या खांद्यावर कुणी बंदूक ठेवतो आहे का ते नीट तपासून पहा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. संशोधनाच्या कामात यश मिळेल. वरिष्ठांचा मान ठेवा. विद्यार्थी वर्गाने उद्धटपणे वागू नये. वाहन जपून चालवावे. कोर्ट कचेरीच्या कामात किरकोळ अडचण येईल. शुभ दि. २३, २५

कुंभ ः- या सप्ताहात मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश करीत आहे. उद्योग-धंद्यात मोठी उलाढाल करता येईल. फायदा होईल. शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल. घरातील व्यक्तींना खूश ठेवता येईल. प्रेमाला चालना मिळेल. विवाहासाठी योग्य स्थळे मिळतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व फारच प्रभावी ठरेल. लोकांचे प्रेम पाहून अंतःकरण भरून येईल. कला-क्रीडा-साहित्यात प्रगती, प्रसिद्धी होईल. नोकरीत चांगला बदल करता येईल. कोर्ट केस संपवा. संशोधनाच्या कामात यशस्वी व्हाल. विद्यार्थी वर्गाचे स्वप्न पूर्ण होईल. घर घेता येईल. परदेशात जाण्याचे ठरवाल. अभ्यासात कठोर मेहनत घ्या. यश मिळेल. व्यसनी लोकांपासून लांब राहा. शुभ दि. २४, २६

मीन ः मेष राशीत सूर्य, मीन राशीत शुक्र प्रवेश होत आहे. धंद्यात काम मिळाले तरी करून घेताना रागावर ताबा ठेवा. थकबाकी मिळवण्याचा प्रयत्न करा. नवीन राजकीय-सामाजिक कार्यात वर्चस्व वाढेल. पदाधिकार मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. मन स्थिर ठेवा. डोक्यात हवा जाऊ देऊ नका. ध्येयाने प्रश्न सोडवा. नोकरीत दबाव राहील. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. तडजोड करावी लागेल. संशोधनाच्या कामात धावपळ होईल. तुमची प्रगती पाहून जेलसी करणारे लोक वाढतील. प्रवासाचा बेत आखाल. वाहन हळू चालवा. वाहतुकीचे नियम मोडू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. विरोधाकडे लक्ष देऊ नये. सौम्य धोरण ठेवा. यश मिळेल. शुभ दि. २५, २७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -