घरICC WC 2023ENG vs SL : गतविजेत्या इंग्लंडचा चौथा पराभव; श्रीलंकेचा आठ गडी राखून...

ENG vs SL : गतविजेत्या इंग्लंडचा चौथा पराभव; श्रीलंकेचा आठ गडी राखून विजय

Subscribe

भारतात सुरू असलेल्या विश्वचषकात काही संघ 350 ते 400 धावांचे डोंगर उभारत आहेत. तर काही संघ मात्र, अगदी शंभर, दीडशे धावांमध्येच गुंडाळले जात आहेत.

बंगळुरू : श्रीलंकेने इंग्लंडचा 8 गडी राखून पराभव केला आहे. श्रीलंकेने 157 धावांचे लक्ष्य 25.4 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले. श्रीलंकेसाठी निसांकाने नाबाद 77 धावांची तर सदिराने 6 धावांची नाबाद खेळी खेळली. तत्पूर्वी, लेहिरूने इंग्लंडचा डाव 33.2 षटकांत तीन विकेट घेत 156 धावांवर आटोपला होता. इंग्लंडचा 5 सामन्यांतील हा चौथा पराभव आहे. आता उपांत्य फेरी गाठणे इंग्लंडसाठी खूप कठीण आहे. (ENG vs SL  Fourth loss for defending champions England Sri Lanka won by eight wickets)

भारतात सुरू असलेल्या विश्वचषकात काही संघ 350 ते 400 धावांचे डोंगर उभारत आहेत. तर काही संघ मात्र, अगदी शंभर, दीडशे धावांमध्येच गुंडाळले जात आहेत. अशातच विश्वचषकाच्या 25 व्या सामन्यात श्रीलंकेसमोर गतविजेत्या इंग्लंडचे आव्हान होते. दोन्ही संघांमधील हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविल्या गेला. यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 156 धावा केल्या आहेत. श्रीलंकेने 157 धावांचे लक्ष्य 25.4 षटकांत दोन गडी गमावून पूर्ण केले.

- Advertisement -

इंग्लंडकडून बेन स्टोक्सने केल्या सर्धाधिक धावा

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 156 धावांवर गारद झाला. 2019 मध्ये विश्वविजेता बनलेल्या संघासाठी हा विश्वचषक खूपच वाईट ठरत आहे. या सामन्यातही हा संघ केवळ 33.2 षटकेच खेळू शकला. बेन स्टोक्सने सर्वाधिक 43 धावा केल्या. त्याच्याशिवाय जॉनी बेअरस्टोने 30 आणि डेव्हिड मलानने 28 धावा केल्या. श्रीलंकेकडून लाहिरू कुमाराने तीन बळी घेतले. अँजेलो मॅथ्यूज आणि कसून रजिताने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तिक्ष्णाने एक विकेट घेतली.

हेही वाचा : ‘आपलं महानगर’चा दणका : अविनाश भोसलेच्या बडदास्तीची होणार चौकशी, मंत्री हसन मुश्रीफांनी दिले आदेश

- Advertisement -

इंग्लंडकडून विलींनेच घेतले दोन बळी

इंग्लंडकडून केवळ डेव्हिड विली हाच 2 विकेट घेऊ शकला. याशिवाय सर्व गोलंदाज विकेट घेण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. खराब फलंदाजीनंतर गोलंदाजीतही इंग्लंडकडून सुमार दर्जाची कामगिरी पाहायला मिळाली.

हेही वाचा : भारतीय नौदलाच्या आठ माजी जवानांना मृत्यूदंड; ‘कतार’च्या निकालाने परराष्ट्र मंत्रालयाला धक्का

गुणतालिकेत इंग्लंड बांगलादेशच्याही खाली

2019 चा विश्वचषक जिंकणारा इंग्लंडचा संघ गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहे. त्यानंतर नॅदरलॅंड असून, इंग्लंडने या विश्वचषकात सुमार कामगिरी सुरूच ठेवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -