घरICC WC 2023रोहित शर्मा नाकारत होता कर्णधारपद पण...; गांगुलीने सांगितली 'ती' इनसाइड स्टोरी

रोहित शर्मा नाकारत होता कर्णधारपद पण…; गांगुलीने सांगितली ‘ती’ इनसाइड स्टोरी

Subscribe

कोलकातामधील एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुली याने हा खुलासा केला आहे.

कोलकाता : रोहित शर्माकडे 2021 हे वर्ष संपत असताना त्याच्याकडे एकदिवशीय आणि टी-20 संघाचे कर्णधारपद देण्यात आले. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या रोहितला ही जबाबदारी दिली होती. काही महिन्यांनंतर विराटने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. रोहितला पुन्हा कसोटी कर्णधारपद मिळाले. पण त्यावेळी रोहित शर्माला कर्णधार बनायचे नव्हते असा खुलासा खुद्द बीसीसीआयचे तेव्हाचे अध्यक्ष सौरव गांगुली याने केला आहे. एवढेच नव्हे तर त्यावेळी काय घडले याची इनसाइड स्टोरीसुद्धा त्यांनी सांगितली. (Rohit Sharma was rejecting the captaincy but… Ganguly told It inside story)

कोलकातामधील एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुली याने हा खुलासा केला आहे. गांगुलीने सांगितले की, मी स्वतः रोहित शर्मावर कर्णधार होण्यासाठी दबाव टाकला होता. तो म्हणाला की, रोहित शर्माला कर्णधारपद घ्यायचे नव्हते, हजारवेळा समजावूनही तो हो म्हणत नव्हता, मग एक वेळ अशी आली की मी म्हणालो की तू हो म्हण किंवा मी तुझ्या नावाची घोषणा करेन. कारण तो हुशार कर्णधार आहे. आणि त्याचे कर्णधारपद स्वीकारण्याचे सकारात्मक परिणाम आजही पाहायला मिळतात.

- Advertisement -

हेही वाचा : वाढत्या प्रदूषणाचा परिणाम; फटाके फोडण्याच्या वेळेत आता एका तासाची घट

रोहितला कर्णधार का व्हायचे नव्हते?

सौरव गांगुलीलाही रोहित शर्माला कर्णधार का व्हायचं नाही असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना तो म्हणाला- मुख्यतः क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट, टी-20 क्रिकेट आणि त्यांचे दडपण, या दडपणाखाली तो होता. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचाही कर्णधार आहे, त्यामुळे त्याच्यावर खूप जबाबदारी होती. पण भारतीय कर्णधार होण्यापेक्षा दुसरं मोठं काहीही असू शकत नाही. त्याने जबाबदारी घेतली याचा मला आनंद आहे असेसुद्धा मुलाखतीत सौरव गांगुलीने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवारांनंतर आता अमित शहांची घेणार अजितदादा भेट; कारण अद्यापही गुलदस्त्यात

सर्वाधिक विजय मिळवणारा कर्णधार

भारतीय संघ विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आतापर्यंत संघ एकही सामना हरलेला नाही. जवळपास प्रत्येक सामन्यात भारतीय संघाने जवळपास एकतर्फी विजय मिळवला आहे. आता उपांत्य फेरीत या संघाचा सामना पाकिस्तान किंवा न्यूझीलंडशी होणार आहे. रोहित शर्मा त्याच्या नेतृत्वाखाली संघाला सातत्याने वेगवान सुरुवात करत आहे. 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर सर्वाधिक विजय मिळवणारा तो कर्णधार बनला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -