घरलाईफस्टाईलब्लड टेस्टवरून होणार मनोविकाराचे निदान

ब्लड टेस्टवरून होणार मनोविकाराचे निदान

Subscribe

ब्लड टेस्टवरून आता मनोविकाराचे निदान होणार आहे. रक्ताच्या नमुन्यात विशिष्ट प्रथिनेची पातळी तपासून मनोविकाराचे निदान केले जाऊ शकते, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. मनोविकृती वेडेपणाचा प्रारंभिक विकार आहे. जर एखाद्या व्यक्तीला या प्रकारच्या मनोविकाराने ग्रासले असेल तर काही वर्षानंतर तो वेडा होऊ शकतो. जेएएमए (JAMA) मनोचिकित्सा जर्नलच्या ताज्या अंकात वैज्ञानिकांनी हा दावा प्रसिद्ध केला आहे. आरसीएसई मेडिसिन अँड हेल्थ सायन्स विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. काही लोकांना किरकोळ किंवा त्यावरील लक्षणांच्या आधारे स्किझोफ्रेनिया (Schizophrenia) सारख्या मनोविकार होण्याची शक्यता असते. अभ्यासकांनी उच्च-जोखमीच्या लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन याचे विश्लेषण केले आहे.

अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर खुलासा

संशोधक बरीच वर्ष यावर संशोधन करीत होते. संशओधन करताना संशोधकांनी मशीन लर्निंगच्या मदतीने रक्ताच्या नमुन्यांमधील प्रथिनांचे विश्लेषण केले. विश्लेषणामध्ये, संशोधकांना प्रथिनेच्या विशिष्ट नमुन्याबद्दल माहिती मिळाली. त्या आधारावर कोणत्या रूग्णाला मानसिक विकार आहे आणि ज्याला हा आजार होणार नाही, याची माहिती मिळू शकेल. संशोधकांना असे आढळले आहे की रक्तातील विशिष्ट प्रकारची प्रथिने जळजळ निर्माण करतात.

- Advertisement -

या अभ्यासाचे मुख्य संशोधक, प्रोफेसर डेव्हिड कोटर म्हणाले की, आम्हाला लोकांना मानसिक आजारापासून वाचवायचे आहे. परंतु यासाठी लोकांमध्ये हा मानसिक आजाराची कोणती लक्षणे आहेत हे शोधणे फार महत्वाचे आहे. आम्ही हे करुन दाखवले आहे. आम्ही मशीन लर्निंगच्या मदतीने या विशिष्ट प्रकारच्या प्रथिनेचे विश्लेषण केले आहे, ज्यामध्ये आम्ही एका ब्लड टेस्टद्वारे भविष्यात कोण मनोविकारांचा बळी पडेल हे शोधू शकू. परिणामी आम्ही मानसिक विकार असलेल्या बर्‍याच लोकांवर अकाली वेळेवर उपचार करू आणि भविष्यात त्यांना हा विकार होणार नाही.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -